मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : वाडिया कॉलनीत मागच्या वेळी मनसेची बाजी, यावेळी सत्ता समीकरणं बदलणार?

BMC Election 2022 : वाडिया कॉलनीत मागच्या वेळी मनसेची बाजी, यावेळी सत्ता समीकरणं बदलणार?

देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे पाहिले जाते.

देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे पाहिले जाते.

देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे पाहिले जाते.

    मुंबई, 24 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक, 166 बाबत. वार्ड क्रमांक 166 वाडिया कॉलनीबाबत (Ward no. 166 Wadiya Colony) बोलायचं झालं तर मनसेचा (MNS) नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आला होता. वार्ड क्रमांक 166 वाडिया कॉलनी येथे 2017च्या निवडणुकीच्या वेळी मनसे उमेदवाराने विजय मिळवला होता. मनसेकडून संजय रामचंद्र तुर्डे यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. त्यांना 5908 इतकी मते मिळाली होती. भाजप उमेदवार सुधीर खातू यांना 5152 मते, काँग्रेसचे नितेश राजहंस यांना 4632, समाजवादी पक्षाचे इस्माईल शेख यांना 1217 इतकी मते मिळी होती. उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -  नितेश राजहंस सिंह, काँग्रेस - 4632 मनाली मंगेश तुळसकर, शिवसेना - 4632 संजय रामचंद्र तुर्डे, मनसे - 5908 सुधीर खातु, भाजप - 5152 अनिल रामचंद्र देसाई, अपक्ष - 55 फर्नांडिस डेरेल पीटर, अपक्ष - 61 रेखा रामकीसन हरिजन, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ - 48 आकाश नामदेव कांबळे, अखिल भारतीय सेना - 36 खान इरफानअहमद नियाजी अहमद, अपक्ष - 32 मच्छींद्र (बाबा ) कोठारे, अपक्ष - 115 प्रिया हेमंत पाटील, अपक्ष - 27 दिनेश बबन पवार, बहुजन समानज पार्टी - 48 अक्षय कचरू सानप, प्रहार जनशक्ती पक्ष - 15 इस्माईल शेख, समाजवादी पार्टी - 1217 वीरकर विठ्ठल यशवंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 269 तर याबरोबरच नोटाला 199 मते मिळाली होती. हेही वाचा - BREAKING : विधान परिषदेच्या तोंडावर अनिल परबांना ईडीची नोटीस, चौकशीला बोलावले! नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी 2017मध्ये याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. यावेळी या वार्डात काय होतं त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या