पाकच्या साखरेवरून मनसे-राष्ट्रवादी आक्रमक, साखरेची पोती केली रिकामी

पाकच्या साखरेवरून मनसे-राष्ट्रवादी आक्रमक, साखरेची पोती केली रिकामी

कल्याण तालुक्यातल्या दहिसर मोरी गावात गोडाऊन वर काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं आंदोलन केलं.

  • Share this:

नवीमुंबई, 14 मे : पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या साखरेवरून राष्ट्रवादी आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीये. एपीएमसी मार्केटमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये साखरेच्या गोडाऊनवर धाड टाकली.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत साखरेची पोती खाली केली.  यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पाकिस्तानची साखर आयात करू नका तसंच त्याची विक्री करू नका अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. तसंच  मार्केटमधील व्यापाऱ्यांनाही कार्यकर्त्यांनी निवदेनं दिली.

तर दुसरीकडे पाकिस्तानी साखर साठवलेल्या गोडाऊनवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. कल्याण तालुक्यातल्या दहिसर मोरी गावात गोडाऊन वर काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. देशातल्या साखरेला योग्य भाव मिळत नसताना केंद्र सरकार पाकिस्तानातून साखर का मागवतंय, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

First published: May 14, 2018, 5:44 PM IST

ताज्या बातम्या