Elec-widget

राज्यातील चार पक्षांना मनसेचा राजकीय टोला, शेअर केली ही पोस्ट

राज्यातील चार पक्षांना मनसेचा राजकीय टोला, शेअर केली ही पोस्ट

भाजप-सेनेचं बिनसल्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने निकालानंतर पहिल्यांदाच टीका केली.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी आम्हाला निवडून द्या असं आवाहन मतदारांना केलं होतं. मात्र, निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा जिंकता आली. तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली आहे. आता सर्वाधिक जागा मिळवूनही भाजप सत्तेबाहेर राहणार आणि जर सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं तर प्रसंगी त्यांना विरोधी पक्षातही बसावं लागेल.

राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना सरकार कोण स्थापन करणार आणि विरोधी पक्षात कोण बसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपने माघार घेतल्यानं ते विरोधी पक्षात असतील पण त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत आपणही विरोधी पक्षातच राहणार असं म्हटलं आहे. त्यांनी अद्याप सेनेला पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्यानं सरकार कोणाचं आणि विरोधी पक्षात कोण याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, मनेसेनं विरोधी पक्ष आणि नेता यावरून टोला लगावला आहे.

सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यात सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्षात बसण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून माझ्या उमेदवारांना मत द्या असं आवाहन केलं होतं. त्याचाच संदर्भ देत मनसेकडून एक पोस्ट करण्यात आली आहे.

मनसेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, राज ठाकरेंनी एका सक्षम विरोधी पक्षाची गरज काय बोलून दाखवली, आता तर सगळेच पक्ष विरोधात बसण्यास तयार झाले. ही पोस्ट एका मनसे समर्थकाने शेअर केली होती. त्याचाच स्क्रीनशॉट मनचेच्या अधिकृत सोशम मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Loading...

महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं तरी ते स्थिर नसेल असंही काही नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपने आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने सत्तेत बसण्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं आहे पण त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सेना,राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह भाजपनेही कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.

सेनेची शेवटच्या क्षणी कोंडी, पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

VIDEO : सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...