Home /News /maharashtra /

दंड 100 रुपयांचा वसुली 1000 ची, मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत पकडले बोगस मार्शल!

दंड 100 रुपयांचा वसुली 1000 ची, मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत पकडले बोगस मार्शल!

मार्शल्सला मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला होता.

डोंबिवली, 26 सप्टेंबर : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात खास करून स्टेशन परिसरात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी पालिकेकडून मार्शल (स्वच्छता सुरक्षक) नेमले गेले आहे. परंतु, या स्वच्छता मार्शलकडून कोरोनाच्या नावाने लूट होत असल्याचा आरोप होवू लागल्याने आज  मनसे  कार्यकर्त्यांनी सकाळी थेट स्टेशन परिसरात जाऊन या मार्शला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात तक्रार नोंद केली असून तक्रारी नुसार पोलिसांनी एक व्यक्तीला अटक करून इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात नेमण्यात आलेल्या मार्शल (स्वच्छता रक्षक) कडून कोविडच्या नावे लूट सुरू असल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून समोर आली होती. या प्रकरणी मार्शल्सला मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला होता. एवढे होऊन सुद्धा आज सकाळच्या सुमारास पुन्हा या मार्शल्सने प्रवाशांना लुटण्यास सुरूवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाहणी करत असताना एका मार्शलला पैसे वसूल करत असताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात केले आहे. या मार्शल्सला पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि कचरा करणे यासाठी यांची नेमणूक केली आहे. पण हे मार्शल लोकांकडून घनकचरा विभागाच्या पावत्या देऊन किंवा बिना पावती 500 ते 1000 रुपयांची लूट करत असल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार जर थांबला नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे सरसंघटक  रुपेश भोईर यांनी दिला. मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात पालिकेकडून 100 रुपये इतका दंड वसुली केली जात असताना हे मार्शल प्रवाश्यांकडून 500 रुपयांपर्यंत दंड वसूल करत होते.  दंड वसूल केल्यानंतर हे मार्शल त्यांना कुठलीही पावती देत नसल्याचे समोर आले. त्यामुळे   पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून 1 आरोपीला अटक केली आहे.  दोन जणांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या