ठाणे, 14 ऑक्टोबर : ठाण्यातील (thane) पोखरण रोडच्या उच्चभ्रू गृहसंकुलामधील लिफ्टमध्ये (Thane Woman beaten by man and his mother in lift) एका महिलेला तरुणाने मारहाण केली होती. एवढंच नाहीतर या तरुणाच्या आईनेही या महिलेवर हात उचलला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी या तरुणाला खळ्ळखट्याक देत चांगलाचे भानावर आणले आहे.
ठाण्यातील कोर्ट यार्ड सोसायटी असे या इमारतीचे नाव असून ही ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती पैकी एक आहे. ५ डिसेंबरला रणदिवे नावाची महिला दिपक गोयल यांच्या घरी सुरू असलेल्या इंटीरीअर कामाबाबत आवाजाने होत असलेल्या त्रासा विषयी दिपक गोयल यांना सांगायला गेल्या असता. दिपक गोयल आणि त्यांच्या आईने रणदिवे यांच्यावर हात उचलला.
एवढंच नाहीतर बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्यानंतर ही रणदिवे या लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट अडवून दिपक गोयल आणि त्याच्या आईने रणदिवे यांना लिफ्ट मध्ये हाताने मारहाण केली. हा सर्व प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला म्हणून महिलेला मारहाणीचा हा सर्व प्रकार उघडकीस आला.
ठाणे : महिलेवर लिफ्टमध्ये उचलला होता हात, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला खळ्ळ खट्याक pic.twitter.com/LJ94nRasWi
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2021
या नंतर कोर्ट यार्ड इमारतीतील सर्व रहिवाशांनी एकत्र येत दिपक गोयल यांचा निषेध केला. तसंच रणदिवे यांनी चितळसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली. मारहाण करुन दिपक गोयल ही व्यक्ती फरार झाली होती. काही दिवसांनी चितळसर पोलिसांनी दिपक गोयल याला अटक केली आणि त्याला जामीन झाला होता. मात्र १५ दिवस दिपक गोयल आणि त्याचे कुटुंबिय बाहेर गेले होते. ते परत ठाण्यात येताच रणदिवे नावाच्या महिलेची माफी मागायला मनसेने भाग पाडले.
फक्त माफी नाही तर महिलेच्या पाया पडायला मनसेने भाग पाडले. याच सोबतच भविष्यात गृहसंकुलात कुणाशीही वाद घातल्यास गाठ मनसेशी आहे, अशी तंबीही मनसे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिपक गोयल याला दिली. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासूनच रणदिवे कुटूंबीय व गृहसंकुलाची बाजू लावून धरल्याप्रकरणी रणदिवे यांनी मनसेच्या संदीप पाचंगे यांचे आभार मानले. यावेळी मनसे प्रभागअध्यक्ष अमोल राणे उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: मनसे