राज ठाकरेंच्या मनसेला फक्त भोपळा फुटला नाही तर मिळाला 'हा' दिलासा

राज ठाकरेंच्या मनसेला फक्त भोपळा फुटला नाही तर मिळाला 'हा' दिलासा

विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर विजय मिळवणं शक्य झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण सत्ता राखल्याचं भाजप आणि शिवसेनेला समाधान आहे तर मागील निवडणुकीच्या तुलनेत मुसंडी मारल्याचा आनंदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला आहे. मात्र या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला अपयश आल्याची चर्चा आहे. कारण विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. मात्र असं असलं तरीही एक आकडेवारी मनसेसाठी काहीशी दिलासा देणारी आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात रोमहर्षक लढतीत मनसेचे राजू पाटील हे विजयी झाले. पण त्याचवेळी महाराष्ट्रीतल 10 मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत. मंदार हळबे (डोंबिवली), अविनाश जाधव (ठाणे), संदीप देशपांडे (दादर, माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर(भांडुप प.), हर्षला चव्हाण(मुलुंड प.), किशोर शिंदे (कोथरुड), संतोष नलावडे(शिवडी)आणि शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण) या मनसेच्या उमेदवारांनी विजयासाठी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी स्पष्ट झाले. भाजप - शिवसेना महायुतीला 162 जागा मिळाल्या तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला 105 जागा मिळाल्या. तर मनसेला 1 जागा मिळाली. इतर विजयी उमेदवारांची संख्या 20 आहे.

हा निकाल पाहिला तर राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे, पण भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेमध्ये बऱ्याच वाटाघाटी होणार असं चित्र आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला 50- 50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. सत्तेत समान वाटा हवा, असाच सेनेचा आग्रह आहे. आता शिवसेनेचा फॉर्म्युला भाजप स्वीकारणार का ते पाहावं लागेल.

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 03:43 PM IST

ताज्या बातम्या