Home /News /maharashtra /

मोठा निर्णय! मुंबईतील मोनो रेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट MMRDA कडून रद्द

मोठा निर्णय! मुंबईतील मोनो रेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट MMRDA कडून रद्द

चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे.

    मुंबई, 19 जून: लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे सीमेवर तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तसेच आर्थिक व्यवहारातही भारतानं युद्ध आरंभलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (MMRDA) मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द केले आहेत. हेही वाचा... चीनसोबत सीमा संघर्षात भारताचे 'या' क्षेत्रात होऊ शकते मोठे नुकसान 10 मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट अंतिम टप्प्यात होते. मात्र, दोन्ही चिनी कंपन्यांचे ते कंत्राट आता रद्द करण्यात आले आहेत. त्या ऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणावाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी भेट घेतील. गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहिद  झाल्यानंतर विरोधी पक्षाने या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. हेही वाचा... चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग बैठकीत सोनिया गांधी व कॉंग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू, तृणमूल कॉंग्रेसचे ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव. ठाकरे, वायएसआरसीपीचे आंध्रचे सीएम वाय.एस. जगन मोहन रेड्डी, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, डावीकडून सीताराम येचुरी आणि डी राजा, टीआरएसचे तेलंगणाचे सीएम चंद्रशेखर राव, द्रमुकचे एमके स्टालिन आणि इतर नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.आम आदमी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल ला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या