मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MLC election result : मला 1 मत कुणी दिलं? काँग्रेस उमेदवार शोधणार 'त्या' मतदाराला!

MLC election result : मला 1 मत कुणी दिलं? काँग्रेस उमेदवार शोधणार 'त्या' मतदाराला!

नागपूर स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. सुरुवातीला काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती.

नागपूर, 14 डिसेंबर : नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत (Nagpur MLC election result)  भाजपने (bjp) विजय मिळवत काँग्रेसला (congress) चांगलाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यापासून काँग्रेस डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर ( ravindra Chhotu Bhoyar) यांच्या उमेदवारीवरून तळ्यातमळ्यात होती आणि अखेर त्यांचा संशय खरा ठरला. या निवडणुकीत रवींद्र भोयर यांना फक्त एक मत मिळाले आहे. गमंत म्हणजे, हे एक मत कुणी दिले याचा शोध आता भोयर घेत आहे.

नागपूर स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. सुरुवातीला काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर अपक्ष मंगेश देशमुख यांना कॉंग्रेसने समर्थन दिलं. त्यानंतर आपले मत कॉंग्रेस समर्थीत उमेदवारालाच, असे सांगणारे भोयर यांना आज झालेल्या मतमोजणीत 1 मत मिळाले आहे. आजच्या नागपूरच्या विधानपरिषदेचा निकालात चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bavankule wins Nagpur MLC election) यांना 362, मंगेश देशमुख यांना 186 व छोटू भोयर यांना 1 मत मिळाले. त्यानंतर छोटू भोयर यांनी आपले एक मत स्वतःला मारले, अशी टीका भाजपने केली.

इंडोनेशियातील त्सुनामीचा भारताला धोका? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची मोठी अपडेट

पण, नाराज झालेले भोयर यांनी आपले स्वत:चे मत काँग्रेसला न देता स्वतःला दिले, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र छोटू भोयर यांनी काँग्रेसचे सर्व दावे फेटाळून लावले. 'मी माझे मत काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना दिल्याचे सांगितलं. 'मी यावरच थांबणार नाही तर भाजपमधील त्या माझ्या हितचिंतक मतदारांचा शोध घेणार आहे. काँग्रेसने जरी मला शेवटच्या क्षणाला उमेदवारी नाकारली तरी मी शेवटपर्यंत आता काँग्रेसमध्ये राहील आणि पुढच्या नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपचा पराभव करणे हाच माझा उद्देश आहे आणि त्यासाठी मी आजपासून कामाला लागलो आहे, असं देखील छोटू भोयर यांनी स्पष्ट केलं.

छोटू भोयर यांचा इतिहास बघितला तर त्यांच्या तीन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये आले होते. मागचे 20 वर्ष ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी अनेक वेळा पूर्व नागपूरमध्ये विधानसभेचे तिकीट भाजपकडे मागितले होते. मात्र दर वेळी शेवटच्या क्षणाला त्यांची तिकीट नाकारले जात होते.  2019 मध्ये देखील तसेच झाले. तेव्हापासून ते काहीसे भारतीय जनता पक्षामध्ये नाराज होते.

नवनिर्वाचित सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या पाच गोळ्या

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला काँग्रेसचे अशी खेळी होती ती छोटू भोयर यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर भाजपचे काही नगरसेवक फुटेल. मात्र पक्षांतर्गत राजकारण आणि छोटू भोयर यांनी दाखविलेली असमर्थता त्यामुळे काँग्रेसने शेवटच्या क्षणाला अपक्ष आमदार मंगेश देशमुख यांना पुढे केले. तरी देखील छोटू  भोयर काँग्रेससोबत राहिले आणि आपण काँग्रेसचाच मदत केल्यास त्यांनी जाहीरपणे सांगितलं. मात्र त्यांना एक मत कोणी दिले याची सर्वत्र चर्चा होती. छोटू भोयर यांनी सांगितले की, मी स्वतःच्या मतदारांचा त्या शोध घेणारे ज्यांनी मला एक मत दिले.

First published:

Tags: Nagpur