अजित पवारांसोबत गेलेले आमदार परतले, केला मोठा खुलासा

अजित पवारांसोबत गेलेले आमदार परतले, केला मोठा खुलासा

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आता माघारी परतले आहे. त्यामुळे अजितदादांचं बंड थंड होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यावरून हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 11 आमदार फोडून भाजपला पाठिंबा दिल्याचं समोर आलं. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीही उरकून टाकला. परंतु, आता राष्ट्रवादीचे फुटलेले  आमदार परत पक्षात परतले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेले होते. परंतु, आपण पक्षातून बाहेर पडलो नाही, मी शरद पवार यांच्यासोबतच आहे असा दावा बनकर यांनी केला आहे. बनकर यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी अजित पवारांसोबत काय गेलो याबद्दल अजिबात कल्पना नव्हती, असा खुलासा केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे हे काही काल रात्रीपासून गायब झाले होते. अखेर ते मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाले आहे. तर दुसरीकडे 11 आमदारांपैकी सहा आमदार माघारी परतले आहे.

अजित पवारांची मनधरणी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. अजित पवारांच्या निर्णयावर अर्थातच यात चर्चा होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांना भेटले. अजित पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न या वेळी झाल्याचं समजतं. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना फोन करून त्यांना भावनिक आवाहन केल्याची माहिती मिळते आहे.

या दोघांमध्ये  6 मिनिटं चर्चा झाली. नेमकं काय बोलणं झालं याबाबत तपशील नाही. पण, अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणार नाहीत, असं स्पष्ट होत आहे. सुप्रिया सुळे यांनी चर्चा झाल्याचा इन्कार केल्याची साम टीव्हीची बातमी आहे.

अजित पवार अद्याप राष्ट्रवादीच्या बैठकीला आलेले नाहीत. ते येणार नाहीत, असं कळतं. धनंजय मुंडे यांचा फोन कालपासून बंद आहे. त्यांच्याशी माध्यमांचा संपर्क झालेला नाही. पण बैठकीच्या ठिकाणी धनंजय मुंडे हजर झाले आहे.

==================

Published by: sachin Salve
First published: November 23, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading