पुन्हा विलंब! त्या एका पत्रासाठी पुन्हा एकदा आमदार अडीच तास ताटकळले

पुन्हा विलंब! त्या एका पत्रासाठी पुन्हा एकदा आमदार अडीच तास ताटकळले

उद्धव ठाकरे गुरुवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ. बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत.

  • Share this:

अभिषेक पांडे (प्रतिनिधी)मुंबई, 27 नोव्हेंबर: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात मंगळवारी संध्याकाळी गेले. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी एका पत्रामुळे उशीर झाल्याची माहिती समोर येत आहे. हे पत्र जर आधीच आमदारांनी सादर केलं असतं तर सत्ता स्थापनेचा दावा आणखी लवकर करता आला असता. मात्र ते पत्र काय होतं आणि आमदारांना दोन तास ताटकळत का रहावं लागलं? याची माहिती समोर आली आहे.

वाचा-सुप्रिया सुळे यांनी दारात उभं राहून केलं सर्व नव्या आमदारांचं स्वागत

महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर मंगळवारी संध्याकाळी दाखल झाले. सर्व आमदारांच्या वतीनं राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी लागणारं बहुमताचं पत्र देण्यात आलं. महाविकासआघाडीला आमचा पाठिंबा आहे असंही प्रत्येक आमदाराची स्वाक्षरी असलेलं पक्ष आणि इतर कागदपत्रही राज्यपालांकडे देण्यात आली. मात्र सर्व पत्रांमध्ये महत्त्वाचं असणारं एक कागदपत्र नव्हतं. हे पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही असं राज्यपालांनी आमदारांना सांगितल्यानं सर्व आमदारात राजभवनात त्या पत्राची वाट पाहात होते. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा झाली खरी. त्यांच्या मंत्रिपदाला सर्व आमदारांच्या सहमतीचंही पत्र जोडलं मात्र उद्धव ठाकरेंचं संमती असणारं पत्र त्यामध्ये नव्हतं. उद्धव ठाकरे स्वत: जोपर्यंत मी मुख्मंत्रिपदासाठी तयार आहे. असं पत्र सादर करत नाहीत तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही असं सांगताचा उद्धव ठाकरेंना संपर्क करण्यात आला.

मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून राजभवनात पाठवलं आणि त्यानंतर तिथल्याच एका आमदारानं त्याची प्रिटआऊट काढून राज्यपालांकडे सोपवण्यात आलं. यादरम्यान सर्व आमदार साधारण दोन ते अडीच तास राजभवनात ताटकळत बसले होते. उद्धव ठाकरेंच्या संमतीचं पत्र सादर केल्यानंतर पुढची प्रक्रिया झाली आणि अखेर ठाकरेंचं सरकार आलं.

वाचा-मोदी, शहांनी 'या' एका नेत्यावर अतिविश्वास ठेवला आणि तिथेच बिघडलं भाजपचं गणित

गुरुवारी संध्याकाळी 6.40 वाजता शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. त्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला.एखाद्या लग्नात यजमान स्वागत करतात त्या थाटात नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या दारात उभ्या होत्या. त्यांनी सर्व आमदारांचं स्वागत हसतमुखाने केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हात हातात घेऊन शुभेच्छा दिल्या. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या युवा आणि प्रथमच निवडून आलेल्या नव्या पिढीतल्या आमदारांचं सुप्रिया सुळे यांनी मिठी मारून जोरदार स्वागत केलं. अजित पवार विधान भवनात आले तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी आनंदाने गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं. अजित पवार मात्र पत्रकारांशी फार काही न बोलताच विधानभवनात निघून गेले.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 27, 2019, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading