Home /News /maharashtra /

विनायक मेटे यांच्या एका दगडात तीन शिकार, उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका

विनायक मेटे यांच्या एका दगडात तीन शिकार, उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका

'दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल की माझ्या पश्चात शिवसेच्या वाघाची शेळी झाली.'

बीड, 5 नोव्हेंबर: उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) तुमच्या सरकारमधील विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)हा माणूस संविधनाचा भंग करतोय, त्याला सरकारमध्ये कसं ठेवलं? ताबडतोफ काडून टाका. काढून टाकायची हिंमत नसेल तर सरकार चालवायला तुम्ही सक्षम नाहीत. सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहेत. मात्र, दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray)यांना दुःख होत असेल की माझ्या पश्चात शिवसेच्या वाघाची शेळी झाली, अशी जहरी टीका आमदार विनायक मेटे (MLA Vinayak Mete) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी बीड (Beed)येथील मराठा आरक्षण विद्यार्थी युवा परिषदेला संबोधित केलं. यावेळी विनायक मेटे यांनी एक दगडात तीन शिकार केल्या, अर्थात त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांवर सडकून टीका केली. हेही वाचा..मराठा आक्रोश मोर्चा! पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी, एसटी बस बंद विनायक मेटे म्हणाले, अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे मराठा आरक्षणासंदर्भात कुंभकरणाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समजाला आज उन्हात बसायची वेळ आली. सरकार आणि अशोक चव्हाण मराठा आरक्षणासंदर्भात खोटं बोलत आहेत. सरकारला वारंवार सुचना करून देखील काहीच झालं नाही. "नाचता येईना अंगण वाकडं" असं सरकारचं सुरू आहे. काँग्रेसचा अजेंडा आहे का? मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजाला उद्धवस्त करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का? याचे उत्तर बाळासाहेब थोरात यांनी द्यावी, असं विनायक मेटे यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांना obc चं 'मसिहा' बनायचं आहे. म्हणून इतर समाजला दूषण देत आहेत. मराठा समाजाचे वाईट चिंतु नका, असा इशारा मेटेंनी वडेट्टीवार यांना दिला आहे. तर ठिणगी महाराष्ट्रभर पेटेल... सरकारमधील मंत्री मराठा आरक्षणा विरोधात बोलत आहेत. म्हणूनच येत्या 7 तारखेला मुंबईत मातोश्रीवर मशाल मोर्चा निघणार आहे. मुख्यमंत्री यांनी लक्ष दिले नाही तर मशाल मार्चच्या ठिणग्या महाराष्ट्रभर पेटेल, अशा इशारा मेटेंनी दिला. मेघाभरती होत नाही. राज्यतील हजारो तरुणांना न्याय देण्याचे काम असताना कोर्टात जा, असं सरकार सांगत आहेत. काही ही प्रश्न असेल तर कोर्टात जा, अस सांगत आहेत. खुर्चीवर राहता कशाला, कोर्टाला सरकार चालवू द्या, असा टोला मेटेंनी आघाडी सरकारला लगावला आहे. मराठा समाज आणि इतर समाजाचा अंत पाहू नका, नाहीतर एक दिवस ही जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे मेटे म्हणाले. शरद पवारांवर साधला निशाणा... शरद पवार यांना मराठा सोडून इतर समाजाचे प्रश्न सोडायला वेळ आहे. समलैंगिक सेल राष्ट्रवादीने काढला. पवार साहेब, जयंत पाटील यांनी अनेक बैठका घेतल्या. अनेक विषयावर ते बैठक घेत आहेत. पण मराठा अरक्षणा संदभात राष्ट्रवादीला बैठक घ्यायला वेळ नाही. हेही वाचा...अमित शाहांचा राजीनामा घ्या, मग माझ्याकडे या; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर पलटवार काँग्रेस अरक्षणाच्या विरोधात आहे. शिवसेनेची मराठा अरक्षणा संदर्भात भूमिका स्पष्ट आहे. यामुळे हे महाविकास आघाडी सरकार आरक्षण देणार नाही. या पुढच्या काळात अनेक आंदोलने होत आहेत. सर्व नेत्याना एकत्रित आले तरच सरकारला घाम फुटेल, अन्यथा ते भांडण लावून देतील. मराठा समाजात संभ्रम पसरवत आहेत, असा आरोप मेटे यांनी केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Vinayak mete

पुढील बातम्या