Home /News /maharashtra /

काय झाडी, काय डोंगार, काय ठेका! आमदार पाटील पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, पाहा Video

काय झाडी, काय डोंगार, काय ठेका! आमदार पाटील पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, पाहा Video

काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच या वाक्यामुळे महाराष्ट्रभर व्हायरल झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आज आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

    सांगोला, 5 जुलै : काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच, असं म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) चांगलेच चर्चेत आले आहे. कार्यकर्त्यासोबत झालेल्या संभाषणातील त्यांचा हा डायलॉग काही दिवसातच महाराष्ट्रभर व्हायरल झाला. यावर एक गाणं सुद्धा आलं आहे. शहाजी पाटलांच्या या दमदार कामगिरीचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी देखील कौतुक केलं होतं. आता सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले. त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी शहाजी पाटील स्वतःला रोखू शकले नाही. शहाजी बापू पाटील यांनी धरला ठेका शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले होते. अशा तणावपूर्ण वातावरणात आमदार कशी मजा करत आहेत, हे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संभाषणावरुन पहायला मिळालं. यावेळी शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडली आहे. यानंतर आता आपल्या मतदारसंघात शहाजीबापू पाटील परतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे आज सांगोल्यात जल्लोषात स्वागत त्यांच्या चीक महूद या गावी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. फटाक्यांच्या आतषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले एकनाथ शिंदेंनी केलं होतं कौतुक शहाजी बापू पाटील यांच्या या वाक्याची खुद्ध एकनाथ शिंदे यांना भुरळ पडली नसती तरच नवल होतं. आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच त्यांनी मनापासून कौतुक केलं होतं. यावेळी शिंदे यांनी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. मग काय शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदेंसमोर हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवलं. तसंच हे वाक्य किती व्हायरल झालंय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केली हे देखील दाखवून दिलं. माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या