मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊतांनंतर शहाजी बापूंचा विनायक राऊत आणि खा. सावंत यांच्यावर बाण; म्हणाले, ही माणसं..

संजय राऊतांनंतर शहाजी बापूंचा विनायक राऊत आणि खा. सावंत यांच्यावर बाण; म्हणाले, ही माणसं..

शहाजी बापू पाटील यांनी विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

शहाजी बापू पाटील यांनी विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

शहाजी बापू पाटील यांनी विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

ठाणे, 2 ऑक्टोबर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर जोरदार टीकासत्र सुरू आहे. शिंटे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेतील नेत्यांवर टीका केली आहे. याआधी त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्यामुळे शिवसेनेची अवस्था वाईट झाली अशी टीका केली होती. यानंतर त्यांनी आता पुन्हा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील -

विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या संजय राऊत सारखे सगळं वाटोळं करुन ठेवलंय, या शब्दात शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. सगळे आनंद दिघे नसतात. पण आनंद दिघे यांचा आशिर्वाद घेऊन जोमाने त्यांचे विचार नेणारा एकच एकनाथ शिंदे असतो हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या पद्धतीने बाबा आमटे यांनी गरीबांचा सेवा केली त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी गरिबांची सेवा करत आहेत, असे शहाजी बापू पाटील म्हणाले.

दसरा मेळाव्याबाबत...

बीकेसीला होणारा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि ज्यांनी सुरुवातीपासून शिवसेना वाढवली, त्यांचा हा दसरा मेळावा आहे. तर दुसरा मेळावा जो होतोय तो ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी प्रतारणा केली, त्यांचा होत आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून यायचे आणि सोडून जायचे, असा त्यांचा जो टीजर आहे पण आम्ही शिवसेना सोडून गेलोच नाही.

हेही वाचा - Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना

जे मागे राहिलेत त्यांनीच आता विचार करण्याची गरज आहे की तिथेच रहायचे की मुख्यमंत्र्यांसोबत यायचे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच हिमालयात गुहा कशी रिझर्व ठेवायचीये हे आम्हाला माहितीये त्यामुळे थोड्या दिवसांनी तुम्हालाच चंद्रकांत खैरेला भेटायला हिमालयात जावं लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.

First published:

Tags: Maharashtra politics, Sanjay raut, Shivsena