मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

'एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

आमदार संतोष बांगर

आमदार संतोष बांगर

आपल्यासोबत गाडीत पत्नी आणि बहीण असल्याने त्यांनी गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर हल्ला करणाऱ्यांना खोदून-खोदून मारलं असतं, असं संतोष बांगर म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  Chetan Patil

अमरावती, 25 सप्टेंबर : अमरावतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर काही शिवसैनिकांनी आज संध्याकाळी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात संतोष बांगर यांच्या गाडीचं नुकसान झालेलं नाही. याशिवाय बांगर हे सुखरुप आहेत. या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी 'न्यूज18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना आव्हान दिलं. आपल्यासोबत गाडीत पत्नी आणि बहीण असल्याने त्यांनी गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर हल्ला करणाऱ्यांना खोदून-खोदून मारलं असतं, असं संतोष बांगर म्हणाले. याशिवाय "ज्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तिथे मी स्वत: पुन्हा जातो. हल्लेखोरांमध्ये धमक असेल तर त्यांवी येवून दाखवावं", असं आव्हान संतोष बांगर यांनी दिलं.

या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "काही नाही. मी, माझी पत्नी आणि बहीण गुरुजींचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मठाबाहेर निघाल्यानंतर चार-पाच तरुण गाडीजवळ आले. त्यांनी घोषणाबाजी केली आणि ते गाडीच्या मागे पळत होते. मी कुटुंबियांसोबत असल्याने त्यांनी मला गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर त्यांना बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा पठ्ठ्या कसा असतो, त्यांना खेदून-खेदून नाही मारलं असतं तर संतोष बांगर म्हणून पठ्ठ्याच स्वत:ला म्हणालो नसतो", अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली.

"ते दोन-चार लोकं होतं. त्यांनी घोषणाबाजी केली. माझी पत्नी आणि बहिणीने मला गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर मी त्यांना दाखवलं असतं. हल्ला झाल्यावर एक घाव आणि दोन तुकडे केले असते. त्यांच्यामध्ये एवढी धमक आहे तर हा संतोष बांगर त्यांना आव्हान देतो की मी त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि त्यांच्यात किती धमक आहे ते पाहतो", असं आव्हान बांगर यांनी दिलं. तसेच हल्ला करणाऱ्यांना आपण ओळखत नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.

(VIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला)

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटातसामिल होणारे आमदार होते.एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

संतोष बांगर आज दुपारी ३ वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजेच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

First published:

Tags: Shiv sena