मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''मला तुझा अभिमान...'', आमदाराचं केतकी चितळेला समर्थन; नव्या वादाला फुटलं तोंड

''मला तुझा अभिमान...'', आमदाराचं केतकी चितळेला समर्थन; नव्या वादाला फुटलं तोंड

केतकी चितळे (Actress Ketki Chitale)  हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली.

केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली.

केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली.

  • Published by:  Pooja Vichare

उस्मानाबाद, 16 मे: अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर सर्वचस्तरावरुन प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान पोस्टनंतर सर्वचजण अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketki Chitale) टीका (criticizing) करत आहे. मात्र आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केतकी चितळेचं समर्थन केलं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेला अटक झाली. तिच्या विरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत हे केतकीच्या पाठिशी उभे आहेत. केतकी चितळे मला अभिमान असल्याच सांगत ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही आणि तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच कौतुक केलं आहे.

''NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'', नाना पटोलेंचा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे. सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केतकी चितळेचं समर्थन केलं.

सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नं केलेलं ट्वीट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. माध्यमांनी सध्या प्रश्न आणि उत्तर सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा, असा सल्ला देत त्यांनी टोला लगावला आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी काल (रविवारी) सुजात आंबेडकर आले होते.

शरद पवार यांना महाराष्ट्रात आदराचं स्थान आहे. जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी शरद पवार हे एक प्रेरणा आहेत. कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात. अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात केतकीनं वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली.

केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ?

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.

First published:

Tags: Sadabhau khot, Sharad Pawar (Politician)