अमरावतीत पहिल्यांदाच मध्यरात्री उघडले न्यायालय, तरीही रवी राणांनी जामीन नाकारला

अमरावतीत पहिल्यांदाच मध्यरात्री उघडले न्यायालय, तरीही रवी राणांनी जामीन नाकारला

शुक्रवारी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते.

  • Share this:

 अमरावती, 14 नोव्हेंबर :  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा (Mla Ravi Rana) यांना अटक करण्यात आली होती. पण, राणा यांच्या जामिनासाठी अमरावतीत पहिल्यांदाच न्यायालय (Amravati court) उघडण्यात आले होते. परंतु, राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी  व लॉकडाउन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी आमदार रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

अटक केल्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20  शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र, रवी राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय सुरू ठेवण्यात आले.

या सर्व आंदोलनकर्त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. आज आपल्यासह सर्व आंदोलनकर्ते अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

आमदार रवी राणा यांना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते तेव्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर लावण्यात आलेला होता.

मातोश्री बंगल्या बाहेर शेतकऱ्यांसह आंदोलन करू -  नवनीत राणा

दरम्यान,खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत आता शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्या समोर येणाऱ्या 15 नोव्हेंबर रोजी आंदोलन करू असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 8:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या