रवी राणा आणि नवनीत राणा यांचे थ्रोट सॅम्पल घेतले चुकीचे, AIIMS ने पाठवले परत

रवी राणा आणि नवनीत राणा यांचे थ्रोट सॅम्पल घेतले चुकीचे,  AIIMS ने पाठवले परत

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

अमरावती, 19 एप्रिल: आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट सॅम्पल चुकीचे घेतल्याचे आता समोर आलं आहे. एवढंच नाही तर नागपूर AIIMS  त्यांचे सॅम्पल परत पाठवले आहेत.

आमदार रवी राणा हे 2 दिवसांपासून रेडियांट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.  खबरदारी तसेच जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे जाऊन आपले थ्रोट स्वॅब तपासणी करण्याचे सुचवले. यानुसार शल्य चिकित्सकांनी त्यांच्याकडे कोविड रुग्णालयाची टीम पाठवून आमदार रवी राणा तसेच त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सॅम्पल घेतले. सदर सॅम्पल हे नागपूर AIIMS येथे पाठवण्यात आले. परंतु AIIMS तपासणी प्रमुख डॉक्टर मीना यांनी भ्रमध्वनीद्वारे सदर सॅम्पल चुकीचे असून पुन्हा सॅम्पल पाठवण्याचे खासदार नवनीत रवी राणा यांना सांगितले.

हेही वाचा... कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीत घोळ, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

या भोंगळ कारभारावर शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम यांना विचारले असता त्यांनी चुकीवर पांघरून घालून पुन्हा थ्रोट स्वॅब सॅम्पल घेण्यासाठी टीम पाठवीत असल्याचे सांगितले. या संतापजनक प्रकारामुळे कोरोनाविषयी जिल्हा प्रशासन किती गंभीर आहेत, हे दिसत आहे. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निकम यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं समजते.

जिल्हा प्रशासनाची माहिती व आकडेवारी यावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न सर्वसामनांच्या मनात निर्माण होत आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकाराची गांभीर्याने चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

हेही वाचा.. धक्कादायक: पालघरमधील कासा उपजिल्हा रुग्णालयातून 24 संशयित रुग्ण पळाले

अमरावती शहरात आतापर्यंत केवळ 6 जणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून थोडक्यात घ्यावे,  असा नियम असताना टेक्निशियन किंवा अन्य अप्रशिक्षित ईसमाद्वारे हे थ्रोट स्वॅब घेतले जातात. अमरावती जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढू नये, म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून हेतुपुरस्परपणे चुकीचे सॅम्पल घेतले जात असल्याची डॉक्टरांमध्ये चर्चा होती. त्यामुळे असे सॅम्पल नागपूरवरून एक तर निगेटिव्ह किंवा रिजेक्ट केले जात होते. अमरावतीमध्ये रिजेक्ट केलेल्या सॅम्पलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार-खासदारांचे चुकीचे घेतले सॅम्पल जात असतील तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आता त्यात दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन संदीप पारोळेकर

First published: April 19, 2020, 8:07 PM IST

ताज्या बातम्या