अमरावती, 18 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत निधी देण्याच्या मुद्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत (District Planning Committee Meeting amravati) आमदार रवी राणा (ravi rana) आणि अमरावतीच्या पालकमंत्री व महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur ) यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहण्यास मिळाली. यावेळी, यशोमती ठाकूर यांनी थेट पोलिसांनाच बोलावले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील परिस्थितीवर चर्चा सुरू होती. मात्र, अचानक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्यात खडाजंगी pic.twitter.com/LbulcOtzJ4
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2021
रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत टाकावी या मागणीसाठी ठराव करावा अशी आग्रही मागणी केली. यावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हळू बोलण्याची सूचना रवी राणांना केली. पण, रवी राणा यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. मी आमदार आहे, मी बोलतोय इथं असं म्हणत रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीआधी काही मदत मिळणार की नाही, असा थेट सवाल केला.
रवी राणा ऐकून घेण्यास तयार नसल्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. हळू आवाजात बोला असं सांगितलं, बोट दाखवून बोलू नका मी म्हणते. असं म्हणत त्यांनी पोलीस आयुक्तांना बोलवावे असे फर्मान सोडले. रवी राणा केवळ नौटकी करत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यामुळे लगेच रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडले.
त्याआधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाण्यापूर्वीच रवी राणा यांनी नियोजन भावनाच्या बाहेरच शेतकऱ्यांचे कुजलेले सोयाबीनची होळी केली होती तर गळालेला संत्रा नियोजन भवणाबाहेर फेकून तुफान नारेबाजी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.