Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंच्या तावडीतून आणखी आमदार निसटला, सांगितला थरारक किस्सा

एकनाथ शिंदेंच्या तावडीतून आणखी आमदार निसटला, सांगितला थरारक किस्सा


एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असलेले नितीन देशमुख यांना ह्रदयविकाराचा धक्का आल्याचे सांगितले जात होते. पण

एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असलेले नितीन देशमुख यांना ह्रदयविकाराचा धक्का आल्याचे सांगितले जात होते. पण

एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असलेले नितीन देशमुख यांना ह्रदयविकाराचा धक्का आल्याचे सांगितले जात होते. पण

    नागपूर, २२ जून :शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि आता गुवाहाटीमध्ये तंबू ठोकला आहे. पण, एकनाथ शिंदेंच्या तावडीतून दोन आमदार निसटले असून माघारी परतले आहे. आमदार नितीन देशमुख हे नागपूरमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी आपल्यासोबत घडलेला थरारक किस्सा सांगितला. एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असलेले नितीन देशमुख यांना ह्रदयविकाराचा धक्का आल्याचे सांगितले जात होते. पण आज दुपारी नितीन देशमुख हे नागपूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट केलं. 'माझी तब्येत एकदम चांगली आहे. मला काहीही झालं नाही. मला तिथल्या पोलिसांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तुमच्यावर कारवाई करायचा आहे, असं सांगून मला घेऊन गेले होते. पण मला कोणताही आजार झाला नव्हता. त्यांचा हेतू चांगला नव्हता. हॉस्पिटलमध्ये मला नेल्यानंतर १५ ते २० लोकांनी पकडून ठेवलं होतं. माझ्या अंगावर इंजेक्शन दिले होते. पण, मी तिथून कसाबसा निघून आलो. मी आमच्या मंत्र्यांसोबत गेलो होतो. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी त्यांच्यासोबत आहे' असंही देशमुख म्हणाले. 'मी पहाटे 12 वाजता हॉटेलमधून बाहेर आलो होतो. रस्त्यावर उभा होतो. मला कोणत्याही गाडीमध्ये बसता येत नव्हतं. १०० एक पोलिसांनी मला पकडून नेलं. त्यानंतर त्यानंतर एका गाडीतून हॉस्पिटलला घेऊन गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. मी त्यांच्यासोबत आहे' असंही त्यांनी सांगितलं. याआधी शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटले आहेत. त्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या याबाबत माहिती दिली आहे. 'शिवसेनेच्या आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले होते. पण त्या गटातून ते मोठ्या शिताफीने निसटले. विधान परिषदेच्या निकालानंतर काल साहेबांनी ठाण्यात एकेठिकाणी जेवणासाठी बोलावलं असं सांगण्यात आलं होतं. पण साहेब कोणते ते स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. कैलास पाटील हे ठाण्याहून गुजरातला निघालेल्या गाडीमध्ये बसले होते. पण त्यांना प्रवासादरम्यान संशय आला. त्यानंतर त्यांना सगळा कट समजला. मुंबईपासून जवळपास 40 ते 50 किमी लांब गाडी गेल्यानंतर कैलास पाटील यांनी लघूशंकेचा बहाणा केला. तोपर्यंत गाडी ही मुंबईपासून 100 किमी पेक्षाही जास्त लांब गेली होती. कैलास पाटील हे लघुशंकेच्या नावाने गाडीतून बाहेर पडले त्यानंतर ते पळत जावून तिथून निसटले. भर पावसात सलग चार ते पाच तास पायी चालल्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर ते एका ट्रॅक्टरच्या मदतीने दहीसरपर्यंत आले. या सर्व घटनाक्रमानंतर कैलास पाटील 'मातोश्री'वर दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबंधित प्रकाराची माहिती दिली. ते आज दिवसभरापासून 'वर्षा' बंगल्यावर आहेत. ते शिवसेनेच्या आजच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी झाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या