तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंविषयी नितेश राणे म्हणतात...

जामीनावर तुरुंगातून सुटल्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 10:27 AM IST

तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंविषयी नितेश राणे म्हणतात...

मुंबई, 11 जुलै : अभियंत्याला शिवीगाळ आणि चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल (बुधवारी)जामीन मिळाला. त्यानंतर बोलताना नितेश राणे यांनी प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

ओरोस न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रविवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.

जामीनावर तुरुंगातून सुटल्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे. नितेश राणे म्हणाले की, 'मी केलेलं आंदोलन कोणाला आवडो या ना आवडो, ते बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं. तसंच त्यांनी माझ्या पाठीवर शाब्बासकीची थापही दिली असती.'

नितेश राणे आणि राडा

मुंबई – गोवा हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर गुरूवार 4 जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल करत चांगलंच धारेवर धरलं.

Loading...

यावेळी नितेश यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. तसंच नितेश राणे यांनी 15 दिवसांत समस्या सोडव, अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली होती.

युवासेनेनं साधला होता नितेश राणेंवर निशाणा

आमदार नितेश राणे यांनी रस्त्याच्या कामाप्रकरणी अभियंत्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं. याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या युवासेननं नितेश राणेंना टार्गेट केलं होतं.

'चिखल इथेही आहे.. चिखल तिथेही होता...पण तो गजाआड आहे... हा मनाआड,' असं कॅप्शन देत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा स्वच्छता करतानाचा एक फोटो युवासेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या कॅप्शनद्वारे तुरुंगात असलेल्या नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला गेला.

बुलडाण्यात बसच्या टपावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास? हे आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...