यवतमाळ, 03 जानेवारी: कोरोना व्हायरसचा (corona virus) प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या (corona patients) रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. त्यातच राज्यातील आमदार (MLA), मंत्री आणि नेते (ministers and leaders) मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. आता हिवाळी अधिवेशनात (Winter Session) हजेरी लावलेल्या दोन आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर आमदार निलय नाईक हे नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. तर पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक आहे. दोन्ही आमदारांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोविड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आमदार निलय नाईक यांनी केले आहे.
पंकजा मुंडेंना ओमायक्रॉनची लागण
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. पंकजा मुंडेंना याआधी एप्रिल 2020 मध्येदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रविवारी समोर आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित, अजित पवारांची माहिती
राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. "काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा- Bank Holiday: आजच पूर्ण करा महत्त्वाची बँकिंग काम, या महिन्यात 16 दिवस बंद आहेत बँका
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus cases