मुंबई, 10 मे : आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केलेल्या मागणीला अखेर यश मिळालं असून 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) पुढं ढकलण्यात आल्या आहेत. पाटील यांनी 29 एप्रिल रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र लिहलं होतं. त्यावर शिक्षण आयुक्तांनी परीक्षा रद्द करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आदेश दिले होते. त्यानुसार 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जाहीर केलं.
(वाचा-आई झाल्यानंतर समीरा होती नैराश्येत; कशी केली मानसिक समस्येवर मात)
शिष्यवृत्ती परीक्षा पुढं ढकलल्या गेल्यामुळं विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळेल असं शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी म्हटलं आहे. मे मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा तूर्तास रद्द कराव्यात. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा आयोजनाबाबत विचार व्हावा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अडकून न पडता पालक व विद्यार्थी यांना गावी जाणं सोयीचं पडेल. यासाठी तातडीने आदेश व्हावेत, अशी विनंती कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली होती.
(वाचा-सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 1ली ते 9वी आणि 11वी परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र 23 मे रोजी होणाऱ्या 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्यभर विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे तातडीनं निर्णय करण्याची विनंतीही कपिल पाटील केली होती.
शिष्यवृत्ती परिक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. परीक्षा 23 मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने होईल असं परिषदेनं म्हटलं होतं. पण सध्याच्या वाढत्या कोविड-19 संक्रमण काळात ही परीक्षा आयोजित करणंच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितावह नसल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय परिषदेने घेतला. परीक्षांचे पुढील वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पुढील तारीख जाहीर केली जाईल असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Exam, Students