Home /News /maharashtra /

आमदार बच्चू कडूंना न्यायालयाचा दणका, 17 वर्षांपूर्वीचे प्रकरण काढले निकाली, 20 हजारांचा दंड

आमदार बच्चू कडूंना न्यायालयाचा दणका, 17 वर्षांपूर्वीचे प्रकरण काढले निकाली, 20 हजारांचा दंड

2005 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत असताना बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती.

2005 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत असताना बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती.

2005 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत असताना बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती.

    अमरावती, 05 जुलै :  शिवसेनेमध्ये मोठ्या बंडाळीनंतर अखेरीस यशस्वीपणे शिंदे सरकार (shinde government) स्थापन झाले आहे. लवकरच शिंदे सरकाराच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटामध्ये सामील झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांना मात्र कोर्टाने दणका  दिला आहे. 17 वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या प्रकरणामध्ये बच्चू कडूंना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे नेहमी या ना त्या आंदोलनामुळे कायम चर्चेत राहतात. राज्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनाची धार मात्र कमी झाली. 2005 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत असताना बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणी अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख 5 ऑगस्ट 2005 रोजी अमरावतीच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली होती. ही बैठक सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केले होतं. तापी नदी प्रकल्पासंदर्भात 'मटकी फोटो' आंदोलन करून बच्चू कडू यांनी जोरदार निदर्शनं केली होी. त्यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. (पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert) त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणाची सुनावणी 4 जुलैला पार पडली. न्यायालयाने या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना वेगवेळ्या कलमान्वये 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या