शिवसेनेसाठी धोक्याची घंटा? बिहारच्या निकालानंतर भाजप नेत्यानं दिले 'हे' संकेत

शिवसेनेसाठी धोक्याची घंटा? बिहारच्या निकालानंतर भाजप नेत्यानं दिले 'हे' संकेत

'मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेची साथ सोडतील'

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: दिल्लीतील भाजप मुख्यालयात बिहार निकालानंतर (Bihar Result) भाजपचा विजयोत्सव सुरू झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections) एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपला (BJP) बिहारमध्ये पहिल्यांदा 74 जागा मिळाल्या आहेत.

त्यात बिहारमधील विजयी पॅटर्न आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपनं केली आहे.

याबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी संकेत दिले आहे. बिहार निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम होणार असा, दावा विधान सभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे.

हेही वााचा...राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतल्या शिक्षकांना लवकरच मिळणार Good News

आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं की, बिहार निवडणुकीसारखे परिणाम आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे. शिवसेनेनं काँग्रेससोबत आघाडी करून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, शिलसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. बिहारी जनतेनं थेट EVM मशीनमधून शिवसेनाला उत्तर दिलं आहे. शिवसेनेला बिहारमध्ये भोपळाही फोडता आला नाही. एवढंच नाही तर बिहारमध्ये जनतेनं काँग्रेसलाही नाकारलं आहे. त्यामुळे बिहारमधील विजयी पॅटर्न मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपनं केली असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेची साथ सोडतील, असा दावा देखील आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बिहार सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगला होता. याच दरम्यान, शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाने सेनेला बिस्कीट हे चिन्ह सुद्धा दिले होते. पण, निवडणूक आयोगाने 'बिस्कीट' चिन्ह दिल्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं आयोगाकडे चिन्ह बदलून द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत 'तुतारी वाजवणारा मावळा' हे चिन्ह दिले होते.

शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता. 'शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होता. आमची मते शिवसेनेला जातात असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य ठरवत शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणा ऐवजी दुसरे चिन्ह दिले.

हेही वााचा...ABVPने महाराष्ट्रातील मोठा चेहरा गमावला, महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा मृत्यू

पण, बिहार मतमोजणीत शिवसेनेची तुतारी मात्र, कुठेही वाजली नाही. शिवसेनेनं एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. विशेष म्हणजे, बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला 0.05 टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक 1.74 टक्के मतं मिळाली आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या