Home /News /maharashtra /

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेंना अटक

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेंना अटक

आर्थिक बेशिस्तीमुळे या बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल 9 कोटी रुपये रुपये थकले होते

पुणे, 25 फेब्रुवारी : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी  आमदार अनिल भोसले, सुर्याजी जाधव, चीफ अकाऊटंट शैलेश भोसले यांना पुणे पोलिसांकडून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक बेशिस्तीमुळे या बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल 9 कोटी रुपये रुपये थकले होते. त्यामुळे या ठेवीदारांनी बँकेचे संचालक तथा आमदार अनिल भोसले यांच्यावर तात्काळ कारवाई मागणी केली जात होती. पण हे आमदार भोसले सहकारमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने सहकार खातं त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलक ठेवीदारांनी केला होता. अखेर या प्रकरणी आमदार शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.  काय आहे हे प्रकरण ? पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेने ठेवीदारांचे 9 कोटी थकवले होते. बँकेच्या उरळी कांचन शाखेत त्यांची कोट्यवधी रुपये अडकून पडलेत. कुणी शेत विकून बँकेत पैसे ठेवलेत तर कुणी आयुष्याची पुंजी या बँकेत ठेवली. पण आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व बँकेने या बँकेवर कारवाई सुरू केल्याने या ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळेनासे झाले. बँकेच्या या आर्थिक बेशिस्तीविरोधात ठेवीदारांनी सहकार खात्याकडेही तक्रार केलीय, पण बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले हे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलक विकास लवांडे यांनी केला होता. या बँकेच्या पुणे आणि परिसरात मिळून एकूण 14 शाखा आहेत. खरंतर गेल्या वर्षभरापर्यंत या बँकेचा कारभार सुरळीत सुरू होता. पण संचालकांनी बेसुमार कर्जवाटप केल्याने ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली. मार्च 2019पर्यंत बँकेत 450 कोटींच्या ठेवी होत्या. पण बँकेमार्फत तब्बल 316 कोटींचं कर्जवाटप झाले. पण 60 टक्के कर्ज हे बुडीत खात्यात जमा होते.  मोठ्या खातेदारांनी पैसे काढताच बँक अडचणीत आली.  सध्या बँकेकडे फक्त 375 कोटींच्या ठेवी असल्याचं समोर आलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या