VIDEO : नाव लक्षात ठेवा...स्वरा गुरव! दिग्गज क्रिकेट झाले पुण्यातील 6 वर्षीय मुलीचे चाहते

VIDEO : नाव लक्षात ठेवा...स्वरा गुरव! दिग्गज क्रिकेट झाले पुण्यातील 6 वर्षीय मुलीचे चाहते

पुण्यातील एका 6 वर्षीय चिमुकलीने आपल्या घरालाच क्रिकेट स्टेडियम करून टाकलं आणि बघता बघता या चिमुकलीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सचं लक्ष वेधून घेतलं.

  • Share this:

पुणे, 29 एप्रिल : क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेटचा डाव मांडणं, हा भारतीयांचा आवडता छंद. आता लॉकडाऊन असल्याने बाहेर पडणं तसंही अशक्यच झालं आहे. मग काय क्रिकेटचं वेड असलेल्या पुण्यातील एका 6 वर्षीय चिमुकलीने आपल्या घरालाच क्रिकेट स्टेडियम करून टाकलं आणि बघता बघता या चिमुकलीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सचं लक्ष वेधून घेतलं.

पुण्यातील स्वाती गुरव या 6 वर्षांच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय फलंदाजाला लाजवेल असा स्टान्स...चेंडूवर भेदक नजर...आणि पहाडी डिफेन्स...यातून होणारी कौशल्यपूर्ण फलंदाजी...या सगळ्यामुळे दिग्गज क्रिकटपटू आणि प्रशिक्षकांनाही या मुलीच्या फलंदाजी कौशल्यानं भुरळ घातली आहे. भारताची स्टार क्रिकटपटू मिताली राज हिच्यापासून ते न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांच्यापर्यंत...अनेकजण स्वराबद्दल भरभरून बोलू लागले आहेत.

स्वराचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ पाहून माइक हेसन हे इतके प्रभावीत झाले की त्यांनी स्वराच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करत एक ट्वीट केलं आहे आणि म्हटलं आहे, नाव लक्षात ठेवा...स्वरा गुरव!

दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व करत या संघाला यशाच्या शिखरावर नेवून ठेवणारी मिताली राज हीदेखील स्वराज कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. 'प्रताभाशाली लहान मुल', असं ट्वीट मिताली राज हिने केलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 29, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या