मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'टर्मिन' इंजेक्शन मिळवण्यासाठी डॉक्टरच्या लेटरपॅडचा वापर; नशेसाठी तरुणाचा कांड वाचून चक्रावाल

'टर्मिन' इंजेक्शन मिळवण्यासाठी डॉक्टरच्या लेटरपॅडचा वापर; नशेसाठी तरुणाचा कांड वाचून चक्रावाल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Buldhana: अवैधरित्या शरीरयष्ठी वाढवण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बुलडाण्यातील एका तरुणानं 'टर्मिन' नावाचं इंजेक्शन डॉक्टरांच्या परस्पर विकत घेतल्याचा (buy termin injection) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 25 डिसेंबर: अवैधरित्या शरीरयष्ठी वाढवण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बुलडाण्यातील एका तरुणानं 'टर्मिन' नावाचं इंजेक्शन डॉक्टरांच्या परस्पर विकत (buy termin injection) घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे टर्मिन इंजेक्शन प्रतिबंधित असून काही महत्त्वाच्या आजारांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली याचा वापर केला जाऊ शकतो. असं असताना बुलडाण्यातील एका तरुणाने एमडी झालेल्या डॉक्टरांच्या लेटरपॅडचा वापर (misuse of MD doctor's letter pad) करून हे इंजेक्शन खरेदी केलं आहे. हा प्रकार उघडकीस येताच डॉक्टरही हैराण झाले आहे.

या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डॉ. शितल भावेश चव्हाण असं फिर्यादी महिला डॉक्टरचं नाव आहे. त्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नांदुरा रोडवरील चव्हाण हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. आरोपी तरुणानं चव्हाण डॉक्टरांच्या बनावट लेटरहेडचा वापर करत प्रतिबंधित असलेलं 'टर्मिन' इंजेक्शन मेडिकलमधून विकत घेतलं आहे. हा सर्व प्रकार मेडिकलमधील cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरने संबंधित युवकाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

हेही वाचा-मुंबईत IPS अधिकाऱ्याची पत्नीही असुरक्षित; भुरट्या चोरानं लाबवली पर्स

आरोपीनं चव्हाण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शितल भावेश चव्हाण यांच्या बनावट लेटरहेडचा वापर करत त्यावर टर्मिन नावाचं इंजेक्शन नमूद केलं होतं. याशिवाय प्रिस्क्रीप्शनच्या शेवटी खाली सही आणि शिक्का देखील मारला होता. या प्रिस्क्रीप्शनच्या आधारे आरोपी तरुणाने मेडिकलमधून हे इंजेक्शन नेलं. पण काही वेळानंतर मेडिकल चालकाला याबाबत शंका आल्याने त्यांनी डॉक्टर शीतल चव्हाण यांना फोन करून इंजेक्शनबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी टर्मिन नावाचं इंजेक्शन कोणालाही दिलं नसल्याचं म्हटलं. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा-मृत्यूनंतर 29 वर्षांनी मायलेकीला मिळाला न्याय; HCने पतीला सुनावली मोठी शिक्षा

खरंतर 'टर्मिन' नावाचं इंजेक्शन ब्लडप्रेशर वाढवणं किंवा कमी करणं यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरण्यात येतं. मात्र काही युवक स्नायू बळकट करण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी त्याचबरोर नशा करण्यासाठी अनधिकृतपणे या इंजेक्शनचा वापर करतात. हे इंजेक्शन प्रतिबंधित असल्याने डॉक्टर्स या इंजेक्शनचं प्रिस्क्रीप्शन सहसा कोणालाही देत नाहीत. मात्र या इंजेक्शनच्या आहारी गेलेले युवक हे इंजेक्शन मिळवण्यासाठी गुन्हेगारी वृत्ती अवलंबतात. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Crime news