मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुक्यात हरवला कसारा घाट, माकडांचा मुक्त संचार, पाहा VIDEO

धुक्यात हरवला कसारा घाट, माकडांचा मुक्त संचार, पाहा VIDEO

राज्यात एकीकडे पाऊस, ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे ऊन या ऊन-सावलीच्या खेळात कसारा घाटातील वातावरणात कमालीचा बदल झालेला बघायला मिळतोय

राज्यात एकीकडे पाऊस, ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे ऊन या ऊन-सावलीच्या खेळात कसारा घाटातील वातावरणात कमालीचा बदल झालेला बघायला मिळतोय

राज्यात एकीकडे पाऊस, ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे ऊन या ऊन-सावलीच्या खेळात कसारा घाटातील वातावरणात कमालीचा बदल झालेला बघायला मिळतोय

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Chetan Patil

शहापूर, 21 सप्टेंबर : राज्यभरातील अनेक भागांमध्ये आजही पाऊस पडतोय. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी वातावरणात गारवा पसरल्याने थंडीचीदेखील चाहूल लागू लागली आहे. वातावरणातील बदलांमुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे पाऊस, ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे ऊन या ऊन-सावलीच्या खेळात कसारा घाटातील वातावरणात कमालीचा बदल झालेला बघायला मिळतोय. कसारा घाटाने धुक्याची चादर पांघरली आहे. त्यामुळे कसारा घाट हा धुक्यात हरवला आहे की काय, अशी परिस्थिती बघायला मिळत आहे.

कसारा घटातील सध्याच्या दृश्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओमध्ये वाहनचालक कशाप्रकारे गाडी चालवत घेवून जात आहेत ते दिसत आहे. घाटात गाडी चालवणं अवघड असतं. कारण तो रस्ता नागमोडी वळणाचा असतो. कुठे तीव्र उतार तर कुठे तीव्र वळण असतो. त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक असते. अशा घाट परिसरात धुके पसरणं म्हणजे वाहन चालकांसाठी आणखी आव्हान बनतं. अशावेळी गाडी लाईट्सच्या मदतीने हळूहळू चालवणे हाच एकमेव पर्याय असतो. धुक्यामुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याचं वेळोवेळी आवाहन केलं जातं. आतादेखील कसारा घाट्यातील जे व्हिडीओ समोर आले आहेत त्यामध्ये वाहनचालकं कशापद्धतीने वाहनं धिम्या गतीने घेवून जात आहेत ते दिसत आहेत.

कसारा घाटात रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी चारचाकी वाहनं उभी आहेत. या गाडीजवळ घाटात वास्तव्य करणारे काही माकडं आल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहेत. ते वाहनावर चढून वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

(संजय राऊत तुरुंगात, खुर्ची मेळाव्यात, शिवसेनेच्या कार्यक्रमात स्पेशल जागा)

कसारा घाटात शक्यतो हिवाळ्यात अनेकदा अशाप्रकारचं वातावरण बघायला मिळतं. वातावरणात झालेल्या बदलांमुळे आज घाटात असं वातावरण दिसत आहे. अर्थात अशा परिसरात वाहनचालकांपुढील आव्हान वाढते. वाहनात असलेल्या प्रवाशांची धाकधूक वाढते. पण त्यांना एक वेगळा अनुभव देखील मिळतो, हेही तितकंच खरं आहे.

First published:

Tags: Nashik