• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पतीच्या निधनाच्या धक्क्यानं घरातून बाहेर पडली अन्...; 17 वर्षे दु:ख सोसल्यानंतर अखेर मुलांना भेटली आई

पतीच्या निधनाच्या धक्क्यानं घरातून बाहेर पडली अन्...; 17 वर्षे दु:ख सोसल्यानंतर अखेर मुलांना भेटली आई

17 वर्षांपूर्वी घरातून अचानक निघून गेलेल्या महिलेला तिचं कुटुंब पुन्हा मिळालं आहे. 17 वर्षांनी आपल्या आईला पाहून मुलांचे आनंदाश्रू थांबत नव्हते.

 • Share this:
  रत्नागिरी, 27 सप्टेंबर: 17 वर्षांपूर्वी घरातून अचानक निघून गेलेल्या महिलेला तिचं कुटुंब पुन्हा मिळालं आहे. रत्नागितील राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या प्रयत्नामुळे संबंधित महिला तब्बल 17 वर्षांनी आपल्या कुटुंबाला भेटली आहे. आपल्या कुटुंबाला पाहून आईचे अश्रूही थांबत नव्हते. तर मुलांनी आईला पाहताच घट्ट मिठ्ठी मारली. 17 वर्षानंतर कुटुंबाच्या भेटीचा हा क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू वाहत होते. आईच्या भेटीनंतर आनंदलेल्या मुलांनी राजरत्न संस्थेचे आभार मानले आहेत. पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने संबंधित महिलेनं घरात कुणालाही न सांगता अचानक घर सोडलं होतं. कुटुंबीयांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. आई पुन्हा मिळेल ही आशाही त्यांनी सोडून दिली होती. पण राजरत्न प्रतिष्ठान सस्थेच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील टीआरपी येथे आरडाओरडा करणारी एक महिला सचिन शिंदे यांनी पाहिली होती. सचिन यांनी संबंधित महिलेकडे जाऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल काहीच आठवत नसल्याचं त्यांना लक्षात आलं. हेही वाचा-चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा यानंतर सचिन यांनी संबंधित महिलेला रुग्णालयात नेत त्यांची कोरोना चाचणी केली. यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. तेथे उपचार घेऊन त्या कोरोनामुक्त झाल्यानंतर सचिन यांनी संबंधित महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात आणलं. याठिकाणी काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा होऊ लागला. त्यांच्याशी संवाद साधला असता, आपण काही काळ रत्नागिरी जिल्ह्यातील देवधे येथे काही काळ वास्तव्याला असल्याची माहिती दिली. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आपलं घर असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. हेही वाचा-मानसिक आरोग्य बिघडलेले जास्तीत-जास्त वयस्क लोक सर्व काही ठीक असल्याचं सांगतात ही माहिती मिळाल्यानंतर सचिन शिंदे यांनी ही माहिती रत्नागिरी पोलिसांना दिली. रत्नागिरी पोलिसांनी सांगलीतील पोलिसांच्या मदतीने महिलेच्या घरचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांना रत्नागिरी याठिकाणी बोलवून महिलेला कुटुंबाच्या हवाली केलं आहे. तब्बल 17 वर्षांनी आपल्या आईला पाहून मुलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नव्हते. संबंधित महिलेनं आपल्या बहिणीला आणि मुलीला लगेच ओळखलं. थोड्या वेळानं त्यांनी आपल्या मुलाला देखील ओळखलं. आईने आपल्याला ओळखल्याचं कळताच मुलाने तिला मिठ्ठीच मारली. कडेगाव येथील रहिवासी असणाऱ्या या महिलेला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. आईला समोर पाहून या सर्व मुलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. 17 वर्षांनी आई भेटल्यामुळे मुलांनी रत्नागितील राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांचे आभार मानले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: