नाशिक हादरलं, गोणीत आढळला बेपत्ता 60 वर्षीय महिलेचा मृतदेह!

नाशिक हादरलं, गोणीत आढळला बेपत्ता 60 वर्षीय महिलेचा मृतदेह!

नाशिकच्या उपनगरच्या जेलरोड येथील ६० वर्षीय महिला मंदाकिनी पाटील या 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या.

  • Share this:

नाशिक, 11 फेब्रुवारी :  बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.  बेपत्ता मंदाकिनी पाटील यांची हत्या झाल्यानं या प्रकरणातील गूढ वाढलंय.

नाशिकच्या उपनगरच्या जेलरोड येथील ६० वर्षीय महिला मंदाकिनी पाटील या 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याबाबत उपनगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद ही कुटुंबीयांनी केली होती. इतकंच नव्हे तर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी महिला शोधून दिल्यास २५ हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केलं होतं.

मात्र, मंगळवारी दुपारच्या सुमारास घराजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडाजवळून वास येत असल्यानं आजूबाजूच्या नागरीक शोध घेतला त्यावेळी गोणीत बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

उपनगर पोलिसांनी याबाबत पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय. शवविच्छेदन करण्यासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जातेय.

डोंबिवलीमध्ये आढळला होता सुटकेसमध्ये मृतदेह

दरम्यान, मागील आठवड्यात 6 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या 9 तासात या प्रकरणाचा छडा लावला होता. पुरुषाने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिलाने हत्या केल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवली पश्चिमेतील बागशाळा मैदानाशेजारी असलेल्या झुडूपात एका ५३ वर्षीय व्यक्तीचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाबाबत अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही उमेश पाटील असल्याची ओळख पटली. ओळख पटताच ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासात डोंबिवली येथे राहणारा प्रफुल्ल पवार या २७ वर्षीय तरुणाला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

आरोपी प्रफुल्ल पवार आणि उमेश पाटील यांची ६ महिन्यांपूर्वी रेल्वेत प्रवासा दरम्यान ओळख झाली होती. या ओळखी नंतर दोघांचे शारीरिक संबंध जुळले अनेक महिने हे शारिरीक संबंध सुरुच होते काही दिवसांपूर्वीच आरोपी प्रफुल्ल पवार याचे लग्न झाले त्यानंतर प्रफुल्ल ने उमेश पाटील यांच्याशी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला ज्यामुळे प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात वाद होऊ लागले. बुधवारी रात्री प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात जोरदार भांडण झाले ही भांडणे मारहाणीपर्यंत गेले. ज्यात प्रफुल्लने उमेश पाटील यांची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरुन डोंबिवली पश्चिमेतील बाग शाळा मैदाना जवळील झुडूपात टाकला होता. अटक केल्यानंतर प्रफुल्ल पवारने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अवघ्या 9 तासांमध्ये आरोपीला अटक करून प्रकरणाचा छडा लावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2020 06:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading