• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मनपा कर्मचाऱ्यांची मुजोरी; फेरीवाल्यांवर कारवाईच्या नावावर गाडीची तोडफोड, VIDEO VIRAL

मनपा कर्मचाऱ्यांची मुजोरी; फेरीवाल्यांवर कारवाईच्या नावावर गाडीची तोडफोड, VIDEO VIRAL

Mira Bhayandar video goes viral: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नियम कठोर करण्यात आले आहेत. मात्र, या दरम्यान कारवाईच्या नावावर अक्षरश: गुंडगिरीच सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:
मिरा-भाईंदर, 29 जून: कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरातील महानगरपालिका, जिल्ह्यांच्या हद्दीत दुपारी 4 वाजेपर्यंतच व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आता मिरा भाईंदरमधील (Mira Bhayandar) एक असा व्हिडीओ समोर आला आहे जी कारवाई पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत मीरा रोड येथील नया नगर येथे संगवी एम्पायरच्या परिसरात फेरीवाले हातगाडीवर विक्री करत होते. यावेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे पथक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी एका फेरीवाल्याची गाडी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास उलथवून टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांनी सदर व्हिडीओ आयुक्तांना पाठवला असून या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्रातील तरुणाला धर्मांतर प्रकरणात यूपीत अटक; कोण आहे इरफान, काय आहे बीड कनेक्शन आणि कोडवर्ड? उपायुक्त अजित मुठे यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देत म्हटले, या फेरीवाऱ्यांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. हे मनपाचे कर्मचारी होते का याबाबतही माहिती घेत आहोत, व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल आणि जर मनपा कर्मचारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रश्न हा उपस्थित होत आहे की, फेरीवाल्याने जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर फेरीवाल्याचा माल जप्त करण्यात येतो किंवा त्याची गाडी सुद्धा जप्त करण्यात येते. मात्र, मिरा भाईंदर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ या फेरीवाल्याचा मालच उलथवून टाकला नाही तर त्याची गाडीही हातोड्यांनी फोडली आहे.
Published by:Sunil Desale
First published: