मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बलात्कार प्रकरणातील संशयिताचं टोकाचं पाऊल; साताऱ्यातील बालसुधारगृहात गळफास घेत आत्महत्या

बलात्कार प्रकरणातील संशयिताचं टोकाचं पाऊल; साताऱ्यातील बालसुधारगृहात गळफास घेत आत्महत्या

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

Suicide in Satara: नात्यातील एका युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या एका अल्पवयीन मुलानं आत्महत्या (minor rape accused commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सातारा, 28 ऑगस्ट: नात्यातील एका युवतीवर अत्याचार (Rape on relative girl) केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या एका अल्पवयीन मुलानं आत्महत्या (minor rape accused commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन संशयित आरोपीनं साताऱ्यातील बालसुधारगृहातच आपल्या आयुष्याचा शेवट केला (suicide in juvenile detention center)आहे. या घटनेची माहिती समोर येताच, संबंधित संशयिताच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठा गोंधळ केला आहे. जमावाला शांत करण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी सुधारगृहाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करावा लागला आहे.

आपल्याच नात्यातील एका तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटाव तालुक्यातील एका तरुणाला वडूज पोलिसांनी अटक केली होती. पण संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी सातारा येथील बालसुधारगृहात करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून आरोपी याच ठिकाणी  शिक्षा भोगत होता. दरम्यान शनिवारी सकाळी त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

हेही वाचा-...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

संशयितानं आज सकाळी बालसुधारगृहातील बाथरूममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाइकांना समजताच नातेवाईकांनी बालसुधारगृहा बाहेर एकत्र येत गोंधळ केला आहे. यामुळे सातारा शहर पोलिसांना मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करावा लागला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Satara, Suicide