तरुणाला भेटली अन् गावात झाली वेगळीच चर्चा, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल!

तरुणाला भेटली अन् गावात झाली वेगळीच चर्चा, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल!

मृत मुलीला राहुल बडवणे नामक तरुणाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते

  • Share this:

मुजीब शेख, प्रतिनिधी

नांदेड, 28 जानेवारी : बदनामी झाल्याच्या तणावातून बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हळदव या गावात ही घटना घडली.

हळदव गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मृत मुलीला राहुल बडवणे नामक तरुणाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. याच कारणाने ती या युवकाच्या संपर्कात आली. आठ दिवसांपूर्वी तिला राहुल बडवणे याने नांदेडला बोलावलं होतं. तेव्हा घरी कोणालाही न सांगता एकटीच नांदेडला गेली होती.

राहुलला एकटीच भेटायला गेल्यामुळे गावात याबाबत वेगळीच चर्चा सुरू झाली. तिच्या चारित्र्याबद्दल चर्चा होऊ लागल्याने बदनामीच्या तणावात तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लोहा पोलिसांनी राहुल बडवणे विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वृद्ध दाम्पत्याने संपवली जीवनयात्रा

दरम्यान, कुर्डूवाडी येथील एका वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे.

कुर्डूवाडी येथील आंतरभारती विद्यालयाच्या नजीक राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली आहे. सुशीला नवनाथ कदम (वय ६५ ) आणि नवनाथ भगवान कदम ( वय ७५) अशी दाम्पत्यांची नावं आहेत. कौटुंबिक कलहातून नैराश्य आल्यामुळे या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचचले.

सुशीला कदम यांनी राहत्या घरात वरच्या मजल्याच्या किचनमध्ये तर नवनाथ कदम यांनी बेडरूममध्ये लोखंडी अँगलला दोरीने लटकून आत्महत्या केल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

नवनाथ कदम हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. निवृत्त होऊन त्यांना सुमारे १७ वर्षे झाले होते. नवनाथ कदम आणि सुशीला कदम या दाम्पत्यांला तीन मुले असून दोन शिक्षक आणि एक व्यावसायिक आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होतं आहे.

First Published: Jan 28, 2020 08:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading