विद्यार्थिनीवर बलात्कार करुन बनविला MMS,सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

विद्यार्थिनीवर बलात्कार करुन बनविला MMS,सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

नागपूर शहरातील सीताबर्डी भागात एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी टीव्ही पाहाण्यासाठी गेली होती, तेव्हा तिच्यावर ही अतिप्रसंग ओढवला.

  • Share this:

नागपूर, 4 मे- शहरातील सीताबर्डी भागात एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी टीव्ही पाहाण्यासाठी गेली होती, तेव्हा तिच्यावर ही अतिप्रसंग ओढवला.

आरोपीने पीडितेवर बलात्कार करुन तिचा मोबाइलवर अश्लील व्हिडिओ बनविला. अश्लील फोटोही घेतले. एवढेच नाही तर सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राकेश हरीश शाहू याला अटक केली आहे. आरोपी रस्त्याच्या बाजुला हातठेला लावतो. तो मागील काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता.

मुलीला तणावात पाहू्न आई-बाबांना पडला होता प्रश्न..

ही घटना 25 एप्रिलला रात्री 8 च्या सुमारास घडली. पीडिता मैत्रिणीच्या घरी टीव्ही पाहाण्यासाठी गेली होती. आरोपी राकेश तिचा पाठलाग करत होता. राकेशने तिला जबरदस्तीने एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नेले. बाथरुममध्ये तिच्यावर बलात्कार केला. नंतर मोबाइलवर अश्लील व्हिडिओ बनविला. अश्लील फोटोही घेतले. एवढेच नाही तर सोशल मीडियावर ते टाकण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे पीडिता प्रचंड तणावात होती. मुलीला नेमके काय झाले, असा प्रश्न तिच्या आई-बाबांना पडला होता. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपबिती सांगितली.

घटनेच्या पाचव्या दिवशी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी राकेश शाहूच्या (वय-23, गवळीपुरा, धरमपेठ, सीताबर्डी ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाला अटक करण्यात आली आहे.

VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

First published: May 4, 2019, 4:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading