मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार 400 जणांचा बलात्कार; एका पोलीस कर्मचारी, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह 8 जणांना अटक

बीड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार 400 जणांचा बलात्कार; एका पोलीस कर्मचारी, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह 8 जणांना अटक

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

Ambajogai beed rape case: अंबाजोगाई येथे अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे.

बीड, 10 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत (Ambajogai Beed) एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार (minor girl raped by 400 men) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Ambajogai rape case police arrested one police personnel)

अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक-एक धक्कादायक बाबी पुढे येवू लागल्या. ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. ती निराधार अवस्थेमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा अनेकांनी उचलला यात कधी पैशाचे अमिष तर कधी जबरदस्ती... तर कधी वेगवेगळ्या अमिषाचा बळी ठरलेल्या या अल्पवयीन पीडितेवर 400 जणांनी अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे.

वाचा : बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरक यातना

अत्याचार करणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवरच ताशेरे ओढत आरोपीला अटक का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत केला होता. न्यायालयाच्या याच भूमिकेमुळे पोलिसांनी गेल्या 24 तासामध्ये आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदार आणि इतर एक लॉज चालक, एक लॉजचा मॅनेजर अशा आठ जणांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या घेतलेल्या या आठ जणांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय यांना किती दिवसाची पोलिस कोठडी सुनावते हेच पहावे लागेल. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या करीत आहेत.

जबलपूर येथे "Sorry बाबा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सॉरी पप्पा...' म्हणत एका 11वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (class 11 girl attempts suicide) केला आहे. स्वत:वर पेट्रोल ओतून तिने पेटवून दिले. या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर (Shocking information reveals from Suicide note) आली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे.

ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. जबलपूर येथील 11वीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिने लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. इतकेच नाही तर आपण पोलिसांत सुद्धा तक्रार केली होती मात्र, पोलिससांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Beed, Crime