Home /News /maharashtra /

शरीरसुखासाठी अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

शरीरसुखासाठी अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

Rape on Minor: बीड जिल्ह्यातील कडा याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने शरीरसुखासाठी एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल (Minor girl blackmail and rape) केलं आहे.

    कडा, 20 फेब्रुवारी: बीड (Beed) जिल्ह्यातील कडा याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने शरीरसुखासाठी एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केलं (Minor girl blackmail and rape) आहे. आरोपीनं पीडित अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तिचं लैंगिक शोषण केलं आहे. तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून 15 हजार रुपये उकळले (Extort 15000 rupees) आहेत. अखेर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. शुभम श्रीमंत सोनवणे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर 16 वर्षीय पीडित मुलगी मनोरुग्ण आहे. आरोपी शुभम याने दारुच्या नशेत अनेकदा पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. नग्न फोटो पाठव नाहीतर, घरी येऊन सर्व प्रकार सांगेन, अशी धमकी आरोपीनं दिली होती. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलीने आपले नग्न फोटो आरोपीला पाठवले होते. हेही वाचा-पुण्यातील ओशो आश्रमात महिला संन्यासिनीचा विनयभंग, 81 वर्षीय साधकावर गुन्हा दाखल त्यानंतर संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं 15 हजार रुपये घेऊन हॉटेलवर ये, अन्यथा फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देखील दिली. यानंतर आरोपीनं पीडितेकडून 15 हजार रुपये उकळून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. हेही वाचा-आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं; सुनेसोबत क्रूरतेचा कळस फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह, समाजात बदनामी केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Rape on minor

    पुढील बातम्या