हर्षल महाजन (प्रतिनिधी)
नागपूर, 19 मे- सोशल माध्यम फेसबुकवर फ्रेंडशिप झाल्यानंतर एका नराधमाने पहिल्याच भेटीत तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर नराधमाने पीडितेची वारंवार भेट घेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी पीडितच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आकाश गजानन टाले (वय-22) असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे हे प्रकरण?
आरोपीने सप्टेंबर 2018 मध्ये पीडितेशी फेसबुकच्या माध्यमातून जवळीक साधली. आकाशने फेसबूकवर स्टायलीश' फोटो टाकून अनेक मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. पीडितेलाही आरोपीने रिक्वेस्ट पाठून होती. तिने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नंतर दोघांची फेसबुकवरून चाटिंग सुरू झाले. मोबाइल क्रमांक एकमेकांना दिला. दोघांची मैत्री झाली.
आकाश टाले हा एका भोजन पोहचविणाऱ्या कंपनीत 'डिलीव्हरी बॉय' म्हणून काम करतो. पीडिता ही 12 वी विद्यार्थिनी आहे. ती पार्टटाईम म्हणून घरात ब्युटी पार्लर चालविते. मुलगी ही 17 वर्षीय अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे वरीष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी सांगितले.
48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा VIDEO