बुलडाणा, 25 जुलै: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीला (Rape on minor girl) फूस लावून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडितेला आपल्या मित्राच्या रुममध्ये कोंडून (Locked up in friend's room) तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तातडीनं पावलं उचलत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (two arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
पीडित मुलगी ही बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपीनं पीडित मुलीला फोन करून ''तुला तुझ्या ओळखीच्या व्यक्तीकडं माझी तक्रार करायची असेल, तर तो चिखलीत आहे. मी चिखली येथे जात आहे, तूही माझ्यासोबत चल'', अशी फूस लावून 23 जुलै रोजी पीडितेला दुचाकीवर बसवून चिखली येथे आणलं. पीडित मुलीला आरोपी तरुणाविरुद्ध नेमकी कोणत्या कारणासाठी तक्रार करायची होती, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
हेही वाचा-भावासमोरच 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा व्हिडिओही केला शूट अन्...
आरोपीनं तक्रार करण्याच्या बहाण्यानं पीडित मुलीला चिखलीमधील डीपी रोडवर असलेल्या मित्राच्या रुमवर नेलं. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीला मित्राच्या रुममध्ये कोंडून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचा मित्र रुमला बाहेरून कुलुप लावून निघून गेला होता. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी त्यालाही सहआरोपी केलं आहे.
हेही वाचा-Stock Market संचालकाचं घृणास्पद कृत्य; तरुणीने पगार मागितला म्हणून केला बलात्कार
आरोपीला अत्याचारासाठी मदत केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतर अल्पवयीन मुलीनं चिखली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी योगेश शंकर महाकाळ (25) आणि उमेश लक्ष्मण रहाटे (23) अशा दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी पिंपळगाव उंडा येथील रहिवासी आहे. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Crime news, Rape on minor