मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

30 वर्षीय अभियंत्याकडून छळ; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

30 वर्षीय अभियंत्याकडून छळ; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित अभियंत्यानं गावातील 14 वर्षीय मुलीची छेड (Molestation) काढल्यामुळे तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

पाटोदा, 07 ऑगस्ट: बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित अभियंत्यानं  गावातील 14 वर्षीय मुलीची सतत छेड (Minor Girl Molest By Engineer) काढल्यामुळे पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Minor Girl Commits Suicide) केली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्वरित आरोपी तरुणाला ताब्यात (Accused arrest) घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका 30 वर्षीय उच्चशिक्षित तरुणाकडून 14 वर्षीय मुलीचा छळ केल्याच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

उमेश अश्रुबा क्षीरसागर असं अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव असून तो पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील रहिवासी आहे. उच्चशिक्षित अभियंता असणारा हा तरुण सध्या कंत्राटदार म्हणून काम करतो. असं असूनही आरोपी उमेश हा मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. आरोपीनं अनेकदा मृत मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढली होती.

हेही वाचा-पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FBवर विकृत उद्योग; छळाला कंटाळून शिक्षिकेनं दिला जीव

दरम्यान, गुरुवारी मृत मुलीचे आई वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपी उमेशनं संबंधित 14 वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीची पुन्हा छेड काढली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. गुरुवारी तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-अकोल्यात विद्यार्थिनीवर 4 वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाचं विकृत कृत्य उघडकीस

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पाटोदा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानतर पोलिसांनी गावातील आरोपी तरुण उमेश क्षीरसागर याला अटक केल आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात छेडछाड करण्यासोबतचं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मृत मुलीचं अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयातील रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Sexual harassment