मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : अश्लील Video पाहून पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, घटनेने साताऱ्यात खळबळ

Satara : अश्लील Video पाहून पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, घटनेने साताऱ्यात खळबळ

Satara minor boy sexually assaulted : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाचा मृतदेह घरातील किचनमध्ये आढळून आला आहे.

Satara minor boy sexually assaulted : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाचा मृतदेह घरातील किचनमध्ये आढळून आला आहे.

Satara minor boy sexually assaulted : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाचा मृतदेह घरातील किचनमध्ये आढळून आला आहे.

सातारा, 8 डिसेंबर : साताऱ्यात एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार (5 year old boy sexually assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मोबाइलवर अश्लील चित्रफित (Obscene video) पाहत त्याचे अनुकरण करत अनैसर्गिक कृत्य केलं. धक्कादायक म्हणजे आरोपी हा सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. (Minor child sexually assault by minor boy in Satara)

आधी अनैसर्गिक अत्याचार आणि मग...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीने मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाहून हे कृत्य केलं आहे. इतकेच नाही तर कुणालाही घडलेला प्रकार कळू नये म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

घरातील किचनमध्ये आढळून आला मृतदेह

मंगळवारी (7 डिसेंबर) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. मृतक मुलाच्या वडिलांना घरातील किचनमध्ये मृतदेह आढळून आला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

वाचा : पत्नीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं केली पतीची हत्या, कारमधून मृतदेह नेला पोलीस ठाण्यात

पुण्यात मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली होती ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच शारीरिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास केला आणि आरोपी तरुणाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दांडेकर पूल परिसरात ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तळजाई पठार येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी दांडेकर पूल परिसरात गेला होता. यावेळी अल्पवयीन मुलाला त्याचा जुना मित्र 21 वर्षीय सागर सोनवणे भेटला. त्यानंतर सागर सोनवणे याने पीडित मुलाला बोलण्यात गुंतवत जवळच असलेल्या एका स्वच्छतागृहात नेलं. यानंतर तेथे त्याला मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

First published:

Tags: Crime, Satara