कीटकनाशक प्रकरणात दोष संबंधित मंत्रालयाचाच-शरद पवार

कीटकनाशक प्रकरणात दोष संबंधित मंत्रालयाचाच-शरद पवार

या प्रकरणी 100 टक्के दोष हा संबंधित मंत्रालयाचाच असल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे.

  • Share this:

नागपूर, 23 ऑक्टोबर: विदर्भात घातक किटकनाशकांच्या बाधेनं शेतकऱ्यांचे काही दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणी 100 टक्के दोष हा संबंधित मंत्रालयाचाच असल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे.

'कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होणं अत्यंत दुदैर्वी आहे. पण कीटकनाशकाच्या संदर्भात देशात एक कायदा आहे. त्याच्या वापरासंदर्भात एक स्वतंत्र संशोधन संस्था दिल्लीत आहे. या संस्थेची मान्यता असल्याशिवाय कुठलेही कीटकनाशक वापरता येत नाही. त्यामुळे अप्रमाणित कीटकनाशक कसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचले हे कळत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केलीय. तसंच या प्रकरणात दोष हा १०० टक्के संबंधित मंत्रालयाचा आहे असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. मी दहा वर्ष मंत्री होतो तेव्हा हा विभाग माझ्याकडे होता. एकदाही अशी घटना झाली नाही. त्यामुळे दोषी कंपन्यांना आणि लोकांना कडक शासन केलं पाहिजे, अशी मागणीही पवारांनी केली आहे.

दरम्यान सोयाबीनच्या प्रश्नावर शरद पवारांनी चिंता व्यक्त केलीय. परतीच्या पावसानं विदर्भात सोयाबीनचं आणि कापसाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नियम किंवा कायद्याच्या चौकटीत न अडकता सरकारनं मार्ग काढून मदत जाहीर केली पाहिजे, असं आवाहन पवारांनी केलं आहे. मी याबाबत सरकारशी चर्चा करणार आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading