फडणवीस सरकारच्या या मंत्र्याचा बंगला बेकायदेशीर, काय आहे प्रकरण ?

फडणवीस सरकारच्या या मंत्र्याचा बंगला बेकायदेशीर, काय आहे प्रकरण ?

सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्या बंगल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांचा होटगी रस्त्यावरील बंगला बेकायदेशीर असल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

सोलापूर, ता. 02 मे : सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्या बंगल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांचा होटगी रस्त्यावरील बंगला बेकायदेशीर असल्याचं उघड झालं आहे. अग्निशमन दलाच्या जागेवर बांधलेल्या बंगल्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

हा बंगला फायर ब्रिगेडसाठी आरक्षित असलेल्या जागेवर नियमांच्या विरोधात जाऊन बांधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपचा आणखी एक नेता अडचणीत आला असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, हा अहवाल देऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे हे रजेवर गेले असल्याचे समजते. मात्र महापालिकेने हा अहवाल दिल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय?

- सोलापुरातील होटगी रस्त्यावरील देशमुख यांचा बंगला

- महापालिकेची ही जागा अग्निशमन दलासाठी आरक्षित

- दोन एकरापैकी 22 गुंठ्यांवर बंगला

- 2001मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली

- देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं

- 2004मध्ये बांधकाम करण्यासाठी पालिकेकडून सशर्त परवाना

- 10 ऑगस्ट 2016मध्ये न्यायालयात जनहित याचिका

- प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

- पालिका आयुक्त यांनी न्यायालयात सादर केला अहवाल

सुभाष देशमुख यांची प्रतिक्रिया

पण दरम्यान, यासंदर्भात सुभाष देशमुख यांना विचारलं असता हा बंगला बेकायदेशीर नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात मी दोषी असेल तर मंत्रीपद सोडण्याची तयारी असल्याचंही ते म्हणाले आहे. पण या याचिकेवर आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रकरणात  मागील एक वर्षांपासून आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा विषय लावून धरला आहे. आगामी काळातही हा विषय लावून धरू अस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयात हा विषय गेला नसता तर सरकारने कधीच न्याय दिला नसता असा आरोप त्यांनी केला आहे.

First published: June 2, 2018, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading