मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भुजबळांनंतर आता शिंदेंचा 'मंत्री' कोरोना पॉझिटिव्ह, इतर आमदारही टेन्शनमध्ये!

भुजबळांनंतर आता शिंदेंचा 'मंत्री' कोरोना पॉझिटिव्ह, इतर आमदारही टेन्शनमध्ये!

एकनाथ शिंदेंच्या आमदाराला कोरोनाची लागण

एकनाथ शिंदेंच्या आमदाराला कोरोनाची लागण

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मंत्र्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मंत्री शंभुराज देसाई यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. स्वत: शंभुराज देसाई यांनी सोशल मीडियावरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो', असं शंभुराज देसाई त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

भुजबळांनाही कोरोना

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांची टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. भुजबळ हे सध्या नाशिकच्या त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत.

आमदार चिंतेत

दरम्यान भुजबळ आणि शंभुराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर आमदारही चिंतेत आहेत. नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, या अधिवेशनामध्ये भुजबळ आणि शंभुराज देसाई इतर आमदारांच्याही संपर्कात आले होते.

First published:
top videos

    Tags: Coronavirus