मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लोकसभेला रावसाहेब दानवेंसमोर जावयांचे आव्हान? पोस्टरबाजीवरून राजकीय चर्चांना उधाण

लोकसभेला रावसाहेब दानवेंसमोर जावयांचे आव्हान? पोस्टरबाजीवरून राजकीय चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सासरे रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवार म्हणून उभा राहण्याची तयारी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दर्शवली आहे. पोस्टरबाजीमुळं राजकीय चर्चा सुरू आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सासरे रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवार म्हणून उभा राहण्याची तयारी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दर्शवली आहे. पोस्टरबाजीमुळं राजकीय चर्चा सुरू आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सासरे रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवार म्हणून उभा राहण्याची तयारी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दर्शवली आहे. पोस्टरबाजीमुळं राजकीय चर्चा सुरू आहेत.

जालना, 17 जून : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb danve) आणि त्यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) या दोघांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. या सासरे-जावयांच्यातील मतभेद राजकीय वर्तुळात सर्वांना परिचीत आहेत. त्यातूनच, आता हर्षवर्धन जाधव हे थेट सासऱ्यांविरोधातच आमने-सामने येणार असल्याचे बोलले जात आहे. जालना लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्यावरून अनेक राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवार म्हणून उभा राहण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. फलक लावल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर, पंचवीस वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचं रूपांतर रामराज्यात आपण करू असा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळं हा विषय जालन्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. मात्र, या पोस्टरबाजीमुळे ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं बोललं जात आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच लावलेल्या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून रावसाहेब दानवे हे निर्विवाद निवडून येत आहेत. रावसाहेब दानवे हे हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात काही लोकांनी हर्षवर्धन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, फलकावर हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांचादेखील फोटो लावण्यात आलाय. त्यामुळं ही बाब रावसाहेब दानवे यांना खटकण्याची शक्यता आहे. याबाबत हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण देताना निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंचं राज्य आहे आणि या राज्याचे रूपांतर रामराज्यात करण्यासाठी आपण या मतदारसंघातून लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवायला तयार आहोत, असे जाधव म्हणाले.

सासरे-जावयांमधील वाद वाढत जावून लोकसभेच्या रिंगणात जाईल की काय, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे. पण, पुढील लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप भरपूर वेळा आहे. त्यामुळे, तोपर्यंत दानवे आणि जाधव यांच्यातील चुरस अशीच राहील, की वाद संपुष्टात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First published:

Tags: Maharashtra politics, Raosaheb Danve