प्रकाश मेहता यांच्याबाबत महापालिकेचा हायकोर्टात आक्षेप

प्रकाश मेहता यांच्याबाबत महापालिकेचा हायकोर्टात आक्षेप

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर आणि त्यांना लागून अतिक्रमणे करण्यात आली असून ती धोकादायक आहेत.

  • Share this:

 

27 एप्रिल :  भाजपचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे विद्याविहार पश्चिम इथल्या जलवाहिनीच्या शेजारची अतिक्रमणे हटवण्याच्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत आहेत’, असा धक्कादायक आक्षेप मुंबई महापालिकेच्या वतीने बुधवारी हायकोर्टात नोंदवण्यात आला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर आणि त्यांना लागून अतिक्रमणे करण्यात आली असून ती धोकादायक आहेत. त्यामुळे ती हटवण्याची मागणी 'जनहित मंच' या संस्थेचे भगवानजी रयानी यांनी याचिकेद्वारे केली होती.

कोर्टाने याचिकेत उपस्थित मुद्द्यांची दखल घेत ही अतिक्रमणं हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत पालिकेतर्फे कोर्टाला माहिती देण्यात आली होती. याच कामातील घाटकोपर, विद्याविहार इथल्या जलवाहिन्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी पालिकेने याचिका केली आहे.

First published: April 27, 2017, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading