Home /News /maharashtra /

महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत खासगी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत खासगी रुग्णालयात दाखल

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे.

मुंबई, 26 जुलै: देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रविवारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 9431 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 267 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. त्या एक धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यमंत्री बनसोडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा...हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश! अश्लिल व्हिडिओ शूट करून खंडणीसाठी व्यापारीला डांबलं मी लवकरच बरा होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल.. 'गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या काळामध्ये उदगीर मतदारसंघात व लातूर जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये पाहाणी करणे, हॉस्पिटलची पाहणी करणे, व्यवस्थापन पाहणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, या व अशा अनेक कामानिमित्त धावपळ करत होतो. मतदारसंघातील मंत्रालयात काही कामे प्रलंबित असल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत असताना, अनावधानाने कुणाच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये खवखव होत होती. त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना तपासणी केली. रात्री उशीरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी तात्काळ मुबंई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. येथील सर्व टीम माझ्यावर लक्ष ठेवून उपचार करत आहेत. मागील चार दिवसांमध्ये माझा अनेक लोकांशी संपर्क आला असल्यामुळे जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते. त्या सर्वांना माझी विनंती आहे आपण स्वतः होम क्वारंटाइन व्हावे.  उदगीर, लातूर,उस्मानाबाद येथे बैठका घेतल्या होत्या. तेथील सुद्धा अधिकारी व कार्यकर्ते यांनी पण होम क्वारंटाईन व्हावं व काही त्रास वाटल्यास तपासणी करून घ्यावी, अशी विनंती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढला... दरम्यान, राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत एका दिवसात 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे. राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली. पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. देशात 24 तासांत 64% रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढत आकडा पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येतं. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा...कोरोनात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, लेकीला संपवून दांपत्याची आत्महत्या दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केंद्राची चिंता वाढली आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. PMO च्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या