VIDEO पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री उतरले पाण्यात, मुलीला घेतलं खाद्यांवर

VIDEO पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री उतरले पाण्यात, मुलीला घेतलं खाद्यांवर

सदाभाऊ खोत यांनी स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास केला. शिरगाव आणि वाळवा गावाला त्यांनी भेट दिली आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.

  • Share this:

असिफ मुरसल, 5 ऑगस्ट : कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: पाण्यात उतरले आणि  लहान मुलीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन कंबरे एवढ्या पाण्यातून तिला बाहेर काढलं. वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचं समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावाला त्यांनी भेट दिली आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. तसच गावातील लहान लेकरांना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली.

यावेळी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. त्यामुळे NDRF च्या पुणे व कोल्हापूर वरून 2 टिम व कोल्हापूर येथील  ट्रेकर्स टीम घटनास्थळी दाखल होत आहेत. ही पथकं काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी दाखल करणार आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नागेश पाटील व तहसीलदार सुनील शेरखाने व तालुका कृषी अधिकारी भगवान माने हे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या