• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: अधिकाऱ्यांची मग्रुरी खपवून घेणार नाही, मंत्री नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

VIDEO: अधिकाऱ्यांची मग्रुरी खपवून घेणार नाही, मंत्री नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

Minister Nitin Raut to officials: कोरोनाच्या काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी मंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे.

  • Share this:
बीड, 12 जून: कोरोनाच्या संकट (Corona Pandemic) काळात आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. याच काळात वीज बिलावरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आता नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उर्जा मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी पुढाकार घेतला आहे. नितीन राऊत यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना चांगलाच सज्जड दम भरला आहे. नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान बीड, परभणी येथे ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या प्लान्टचं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. समस्या तर अनेकांच्या असतात परंतू या समस्यांचे निराकरण जितक्या चांगल्या प्रकारे करता येतील तो करण्याचा प्रयत्न माझा आहे. नवीन वीज धोरण, नवीन सौर ऊर्जेचं धोरण आणलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करण्यात येत आहे. मंत्री आदित्य ठाकरेंचं काका राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल, घेतला 'हा' निर्णय मान्सूनच्या काळात ज्या-ज्या ठिकाणी वीज खंडित होते तेथे योग्य व्यवस्था रहावी, नागरिकांना मदत व्हावी. तसेच नागरिकांच्या तक्रारी इंजिनिअरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जावी अशी तरतूद केली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले. एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही. असा सज्जड दम राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. नितीन राऊत यांनी पुढे म्हटलं, सर्व ग्राहकांना विनातक्रार वीज वितरण सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने अधिक सतर्कतापूर्वूक यंत्रणांनी तयार रहावे.
Published by:Sunil Desale
First published: