मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका

VIDEO: लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका

Gulabrao Patil Dance Video: जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं आज लग्न पार पडणार आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा भन्नाट डान्स केला आहे.

Gulabrao Patil Dance Video: जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं आज लग्न पार पडणार आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा भन्नाट डान्स केला आहे.

Gulabrao Patil Dance Video: जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं आज लग्न पार पडणार आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा भन्नाट डान्स केला आहे.

जळगाव, 29 नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत हिच आज लग्न आहे. मुलीच्याच लग्नातील संगीत कार्यक्रमात संजय राऊतांनी ठेका धरला होता. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil dance video) यांचा व्हिडीओ समोर आला आहे. गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं देखील आज लग्न पार पडणार आहे.

काल त्यांच्या मुलाचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी डीजे लावल्यावर, जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपला जलवा दाखवला आहे. डीजेचे तालावरती ठेका धरत त्यांनी मनमुराद डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं असून अनेकांनी त्यांच्या नृत्यकलेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आज सायंकाळी जळगाव येथील पारधी याठिकाणी गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीचे अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दादा भुसे, नवाब मलिक, छगन भुजबळ यांच्यासह अन्य 50 आमदार या लग्नाला उपस्थित लावणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तूर्तास मुलाच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा-'PM की शादी', संजय राऊतांच्या घरी लगीनघाई; खास लग्नपत्रिका व्हायरल

दुसरीकडे, आज शिवसेनेचे रोखठोक नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) हीही विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar) यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने मुंबईच्या रेनेन्सो या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये नुकतंच संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Dance video, Gulabrao patil, Jalgaon