‘नोकर भरतीच्या आड कुणी येऊ नये’ MPSC परीक्षा लांबणीवर टाकायला भुजबळांचा विरोध

‘नोकर भरतीच्या आड कुणी येऊ नये’ MPSC परीक्षा लांबणीवर टाकायला भुजबळांचा विरोध

'असा निर्णय झाला तर ओबीसी आणि इतर समाजावर यामुळे अन्याय होईल. नेत्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.'

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 09 ऑक्टोबर: MPSCच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्यात या मराठा संघटनांच्या मागणीवरून आता वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha reservation Issue) निकाली निघेपर्यंत परीक्षा घेऊ नये अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधले वजनदार मंत्री छगन भुजबळ यांनी परीक्षा पुढे ढकण्याला तीव्र विरोध केला आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची असं भुजबळांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवतोय. भरतीच्या आड कोणी यावं अस मला वाटत नाही.

असा निर्णय झाला तर ओबीसी आणि इतर समाजावर यामुळे अन्याय होईल. नेत्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

मनाला लागेल आशा गोष्टी टाळत्या आल्या तर टाळल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन लढाई लढली. महाराज हे सगळ्यांचे आहेत.

‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, राऊतांनी साधला निशाणा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना सांगितलं थोबाडात मारा, आता बघू खडसे काय करतात. खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच आहे.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले आहे.

हेही वाचा...कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या